ETV Bharat / state

बाजारपेठ 'अनलॉक' पण व्यवसाय 'लॉक', कोरोनामुळे बुटीक व्यवसाय अडचणीत

author img

By

Published : Aug 14, 2020, 10:40 AM IST

Updated : Aug 14, 2020, 11:30 AM IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बुटीक व्यवसाय करणाऱ्या जळगावातील व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी भरून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा माल पडून आहे. आता महत्त्वाचा हंगाम निघून गेला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी, बाजारपेठेत ग्राहक नाहीत. सोशल मीडिया, ऑनलाइन अशा पर्यायांना ग्राहक पसंती देत असल्याने बुटीक व्यावसायिक अक्षरशः हतबल झाले आहेत.

जळगाव अनलॉक न्यूज
जळगाव अनलॉक न्यूज

जळगाव - कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अर्थव्यवस्था रुळावर यावी, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यानंतर हळूहळू व्यवहार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजारपेठेत अद्यापही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये हवी तशी गती आलेली नाही. बुटीक व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

जळगाव बुटीक व्यवसाय न्यूज

हेही वाचा - प्रत्येक विभागाने सोपवलेली जबाबदारी समन्वयातून पार पाडावी - जिल्हाधिकारी

आपल्याकडे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग जसा वाढत गेला, तसा लॉकडाऊनही टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. लॉकडाऊनच्या काळाला पाहता-पाहता आज साडेचार महिने उलटले आहेत. या काळात सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाल्याने अर्थचक्र थांबले. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने 'मिशन बिगीन अगेन' यानुसार लॉकडाऊनमुळे टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सम-विषम पद्धतीने दुकाने उघडत आहेत. अशा परिस्थितीत बाजारपेठ 'अनलॉक' झाली असली तरी ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी व्यवसाय मात्र 'लॉक' असल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगाव बुटीक व्यवसाय न्यूज
जळगाव बुटीक व्यवसाय न्यूज

जळगाव शहरात महात्मा गांधी मार्केट, महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट याठिकाणी कापड तसेच बुटीक व्यावसायिकांची दुकाने आहेत. नामांकित बुटीक व्यावसायिकांचा विचार केला तर सर्व मार्केट मिळून जळगावात जवळपास 20 ते 25 व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे प्रचलित फॅशनचे रेडिमेड कपडे, ड्रेस तसेच ड्रेस मटेरियल मिळते. लॉकडाऊनपूर्वी जळगावातील बुटीक व्यावसायिकांची महिन्याकाठी सुमारे 22 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल होत होती. मात्र, आता लॉकडाऊननंतर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बुटीक व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थेट 5 ते 10 लाख रुपयांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत नफा तर सोडा पण, दुकान, शोरुमचा मेंटेनन्स, कामगारांचे पगार असा दैनंदिन खर्चही निघत नसल्याचे बुटीक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याशिवाय कर्जाचे हप्ते, विविध कर, कंपन्यांकडून क्रेडिटवर घेतलेल्या मालाचे पैसे कसे द्यायचे, या विवंचनेत बुटीक व्यावसायिक सापडले आहेत.

कोरोनामुळे व्यवसाय झाला ठप्प -

कोरोनामुळे बुटीक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. यासंदर्भात 'ई- टीव्ही भारत'ला अधिक माहिती देताना बुटीक व्यावसायिक पंकज कौराणी म्हणाले की, कोरोनामुळे बुटीक व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. साधारणपणे दरवर्षी लग्नसराईमुळे जानेवारी ते जुलै असा सुमारे 6 ते 7 महिन्यांचा काळ खूपच महत्त्वाचा असतो. या काळात महिला, तरुणी तसेच लहान मुलींसाठी फॅशनेबल कपड्यांना, ड्रेस मटेरियलला मोठी मागणी असते. याशिवाय नववधूंच्या ड्रेसची देखील प्रचंड मागणी असते. त्यामुळे आम्ही सर्व व्यावसायिक हा व्यवसायाचा हंगाम लक्षात घेऊन हंगामपूर्वीच माल भरून ठेवतो. परंतु, यावर्षी कोरोनामुळे आमचे सर्व नियोजन फसले. हंगामाचा मूळ काळ लॉकडाऊनमुळे वाया गेला. लाखो रुपयांचा माल पडून आहे. एक रुपयाचाही व्यवसाय झाला नाही. लग्नसराई आटोपल्यानंतर आता ऑगस्टपासून सम-विषम पद्धतीने बाजारपेठ उघडली आहे. त्यामुळे काही एक उपयोग होणार नाही. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते, कंपन्यांकडून घेतलेल्या मालाचे पैसे, कर कसे भरायचे हा प्रश्न आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने कर्जाचे हप्ते तसेच कर वसुलीत काही तरी सवलत देऊन व्यापाऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी पंकज कौराणी यांनी केली.

व्यवसायासाठी ऑनलाईन, सोशल मीडियाचा पर्याय निष्फळ -

सरकारने 'मिशन बिगीन अगेन' नुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी कोरोनाच्या संसर्ग लक्षात घेऊन, आवश्यक ती खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवसाय करताना गर्दी होऊ नये म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, 5 पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये, मास्क आणि हँड सॅनिटायझरचा सक्तीने वापर करणे, सम-विषम पद्धतीने दुकाने उघडणे, दुकाने तसेच शोरुममध्ये कपड्यांचे ट्रायल रूम बंद ठेवावेत, अशा प्रकारचे अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ग्राहक खरेदीला बाहेरच पडत नाहीत. या सर्वांवर पर्याय म्हणून व्यवसाय करण्यासाठी मालाची होम डिलिव्हरी किंवा ऑनलाईन, सोशल मीडियाचा पर्याय आहे. पण जळगावात त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. बुटीक व्यवसाय हा पूर्णपणे ग्राहकांच्या आवडीवर अवलंबून आहे. खरेदीसाठी दुकानात येणारा ग्राहक एक ड्रेस घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रंग, पॅटर्न, कापडाचा दर्जा निरखून पाहतो. त्यानंतर फिटिंगसाठी अनेकवेळा ट्रायल करतो. परंतु, ऑनलाईन किंवा सोशल मीडियावरून केलेल्या जाहिरातीत ग्राहकाला हे पर्याय उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्राहक माल खरेदी करत नाहीत. म्हणून बुटीक व्यवसायासाठी ऑनलाईन, सोशल मीडियाचा पर्याय निष्फळ ठरल्याचेही यावेळी पंकज कौराणी म्हणाले.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात युरियाची टंचाई; खतांची तूट भरून निघत नसल्याने शेतकरी हैराण

दसरा, दिवाळीत व्यवसाय सुरळीत होण्याची अपेक्षा -

कोरोनामुळे बुटीक व्यवसायाचा हंगामाचा महत्त्वाचा काळ हातून निघून गेला. अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांना आता पुढे येणाऱ्या दसरा, दिवाळी सणांच्या काळातच व्यवसाय सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. सेंट्रल फुले मार्केटचे अध्यक्ष तसेच बुटीक व्यावसायिक रमेश मतानी यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान, जळगावातच नव्हे तर, संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कोरोना आटोक्यात आला नाही तर मात्र काही खरे नाही. अशीच स्थिती कायम राहिली तर बुटीक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल, असेही रमेश मतानी म्हणाले. व्हिडिओ कॉलिंग, व्हाट्सअ‌ॅपवर खरेदी करण्यास ग्राहक पसंती देत नाहीत. कारण ड्रेसचा रंग, साईज अशा बाबतीत ग्राहक संभ्रमात असतो. त्यामुळे हे पर्याय निरर्थक ठरले आहेत. आता तर ग्राहकांची वाट पाहत दुकान उघडून बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंतही मतानी यांनी व्यक्त केली.

Last Updated : Aug 14, 2020, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.