ETV Bharat / state

भाजपकडून ओबीसी नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न, जळगाव दौऱ्यात आमदार रोहित पवारांची टीका - etv bharat live

ओबीसी नेत्याची ताकद करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ बोलताना रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य करताना ही टीका केली. आमदार पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार
author img

By

Published : Oct 22, 2021, 1:21 PM IST

जळगाव - भाजपकडून ओबीसी नेत्याची ताकद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ बोलताना रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य करताना ही टीका केली. आमदार पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार

गिरीश महाजनांवरही केली टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीबाबत विचारणा केली असता, आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, स्वतःची ताकद वाढवण्यासाठी बहुजन ओबीसी नेत्याची ताकत कमी करण्याचे काम येथील भाजप नेत्यांकडून होत आहे. ईडी व सीबीआय यंत्रणांकडून होणारी चौकशी हा त्याचाच एक भाग आहे, असे सांगत आमदार पवार यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर देखील ईडी व सीबीआयच्या अशाच कारवाया सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

संत मुक्ताई मंदिरात घेतले दर्शन, भक्तीत झाले रममाण-

आमदार रोहित पवारांच्या दौऱ्याला आज सकाळी मुक्ताईनगर येथून सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी आदिशक्ती संत मुक्ताई मंदिरात मुक्ताबाईंचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आरतीही केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांना समवेत विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

खडसेंना भाजपत चुकीची वागणूक दिली-

एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली. त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे बहुजन समाजाच्या एका मोठ्या नेत्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई वाढल्या. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर देखील कारवाई केली जात आहे. दडपशाहीचा मार्ग भाजपने अवलंबला असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

गिरीश महाजन यांना पैशांच्या ताकदीचे घमंड-

जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते पैशांच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांची बातचीत करताना केला होता. याबाबत त्यांनी थेट गिरीश महाजन यांचे नाव घेत, गिरीश महाजन यांना पैशांच्या ताकदीचा घमंड असून, फोडाफोडीच्या राजकारणासाठी ते वापर करत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी घोटाळ्याची चौकशी व्हायला पाहिजे - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.