ETV Bharat / state

जळगाव महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांवर भाजप बंडखोरांचे वर्चस्व; भाजप अधिकृत उमेदवारांची दाणादाण - जळगाव शहर बातमी

जळगाव महापालिकेतील भाजपच्या बंडखोरांनी महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत चारही जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप बंडखोर असा सामना पाहायला मिळाला.

न
निवडीवेळचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 12, 2021, 7:48 PM IST

जळगाव - मार्च महिन्यात झालेल्या महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या गोटात सामील होत सत्तांतर घडवून आणणाऱ्या भाजप बंडखोरांनी प्रभाग समिती सभापती निवडणुकीतही भाजपचे पानिपत केले आहे. भाजपच्या बंडखोरांनी महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत चारही जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप बंडखोर असा सामना पाहायला मिळाला.

ऑनलाइन निवडणूकवेळी
ऑनलाइन निवडणूकवेळी

सोमवारी ऑनलाइन पद्धतीने प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यात प्रभाग समिती एकमध्ये प्रा. सचिन पाटील यांची बिनविरोध तर प्रभाग दोनमध्ये प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती तीनमध्ये रेखा पाटील तर प्रभाग समिती चारमध्ये शेख हसिना यांचा विजय झाला. जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड व नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

निवडीनंतरचे छायाचित्र
निवडीनंतरचे छायाचित्र

भाजप विरुद्ध भाजप बंडखोर असा रंगला सामना

प्रभाग समिती सभापती पदासाठीच्या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप बंडखोर, अशी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. भाजपने कोणत्याही प्रभाग समितीमध्ये बहुमत नसतानाही आपले उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रभाग समिती 3 व 4 वगळता इतर प्रभाग समित्यांध्ये भाजप बंडखोरांनी भाजप नगरसेवकांचा पराभव केला.

निवडीनंतरचे छायाचित्रन
निवडीनंतरचे छायाचित्र

अशी झाली निवडणूक

प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये प्रा.सचिन पाटील यांच्या व्यतिरीक्त एकही अर्ज दाखल झाला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये भाजप बंडखोरांकडून प्रवीण कोल्हे तर भाजपकडून मुकुंदा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या जागेसाठी झालेल्या मतदानात प्रवीण कोल्हे यांना 13 तर मुकुंदा सोनवणे यांनी 7 मते मिळाली. सोनवणे यांचा 6 मतांनी पराभव करत, प्रवीण कोल्हे विजयी ठरले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एका जागेसाठी चार अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या समितीमध्ये काट्याची लढत होईल, अशी शक्यता होती. मात्र, एमआयएमच्या शेख सईदा व सुन्ना बी देशमुख यांचे अर्ज बाद ठरल्यामुळे भाजपचे उमेदवार धीरज सोनवणे व बंडखोरांच्या उमेदवार रेखा पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांनी भाजप बंडखोर उमेदवार रेखा पाटील यांना मतदान केल्यामुळे रेखा पाटील यांनी धीरज सोनवणे यांचा 1 मताने पराभव केला. प्रभाग समिती 4 मध्ये देखील सरळ लढत झाली. याठिकाणी भाजपने उषा पाटील तर भाजप बंडखोरांकडून शेख हसिना यांना संधी देण्यात आली होती. शेख हसिना यांना 10 तर उषा पाटील यांना 6 मते मिळाली.

निवडीनंतरचे छायाचित्र
निवडीनंतरचे छायाचित्र

महापालिकेत भाजप बॅकफूटवर

या निवडणुकीपूर्वी भाजपच्या बंडखोरांनी नियुक्त केलेले गटनेते ॲड. दिलीप पोकळे व उपगटनेते चेतन सनकत यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून भाजपच्या बंडखोरांना मतदान करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, भाजपने हा व्हीप धुडकावून लावला. दरम्यान, महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर आता प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीतही भाजपचे पानिपत झाले आहे. भाजप बंडखोरांच्या भूमिकेमुळे महापालिकेत भाजप बॅकफूटवर आला आहे.

निवडीवेळचे छायाचित्र
निवडीनंतरचे छायाचित्र

हेही वाचा - जळगावात लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.