ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे; भाजप नेते गिरीश महाजन यांची टीका - गिरीश महाजन यांची टीका

जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. आज जी वेळ राज्यावर आली आहे, ती कधीही आलेली नव्हती. अतिशय दुर्दैवी वेळ या सरकारने आणली आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली आहे.

गिरीश महाजन
गिरीश महाजन
author img

By

Published : Sep 19, 2021, 8:55 PM IST

Updated : Sep 19, 2021, 9:07 PM IST

जळगाव - राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही जनतेच्या मनातील इच्छा आहे, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी रविवारी (दि. 19 सप्टेंबर) जळगावात उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कोरोना लसीकरण महाशिबिराचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन हे रविवारी सायंकाळी जळगावात आलेले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी, शहकाटशहाचे रंगलेले राजकारण अशा विषयांवर त्यांनी मत मांडले.

बोलताना गिरीश महाजन

आमच्यापेक्षा जनतेलाच वाटत, महाविकास आघाडी पायउतार व्हावी

गिरीश महाजन म्हणाले, राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन व्हावे, हे सरकार पायउतार व्हावे, असे आमच्यापेक्षा जनतेलाच वाटत आहे. राज्यातील जनता त्रस्त झाल्याचे आज आपण सर्वजण बघत आहोत. जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. आज जी वेळ राज्यावर आली आहे, ती कधीही आलेली नव्हती. अतिशय दुर्दैवी वेळ या सरकारने आणली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय

राज्यात आता बदल झाला पाहिजे, हे जनतेच्याच मनात आहे. हे सरकार जाऊन भाजप सरकार आले तर सर्वांना न्याय मिळेल. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावत आहोत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे राज्यभर दौरा करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सक्षम विरोधी पक्ष म्हणून पूर्णपणे माप देण्याचे काम आम्ही करतोय, असेही गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा - जळगाव: सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या, आजचे दर

Last Updated : Sep 19, 2021, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.