ETV Bharat / state

BREAKING : एकनाथ खडसेंचा भाजपाला 'जय श्रीराम'; शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश

author img

By

Published : Oct 21, 2020, 1:00 PM IST

Updated : Oct 21, 2020, 4:30 PM IST

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. मात्र, आता खडसे यांनी राजीनामा दिला असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

नाथ खडसेंचा भाजपाला 'जय महाराष्ट्र'; पक्षाकडे दे

जळगाव- गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. आता या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे दिला आहे. आता ते येत्या शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषेदत दिली. मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचे बोलले जात आहे.

ईटीव्ही भारतशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आजच पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रावादी प्रवेशावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ईटीव्ही भारतने खडसे राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.

या कारणाने होते नाराज -

भाजपचे ज्येष्ठे नेते आणि उत्तर महाराष्ट्रातील वजनदार राजकारणी एकनाथ खडसे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. २०१४ मध्ये युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर जबाबदार पदावर असलेल्या एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळा प्रकरणी राजीनामा देण्याची वेळ आली. त्यानंतर त्यांचे पक्षात खच्चीकरण करण्यात आले. एवढेच नाही तर २०१९ च्या निवडणूक प्रक्रियेतून त्यांना बाहेर ठेवण्यात आले.

एकनाथ खडसे यांनी पक्षासाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात भाजप पक्षवाढीसाठी एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी अथक प्रयत्न केले होते. मात्र, खडेस यांनाच अखेर तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. मात्र, खडेंसाना भाजपने मुलीस तिकीट देण्याचे मान्य करत पुन्हा एकदा डावलेले. अंतर्गत राजकारणातून पक्षातून बाहेर फेकले गेलेल्या खडसेंनी माझा गुन्हा काय आहे? हे तरी सांगा अशी वारंवार विचारणा पक्षाकडे केली. मात्र, फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने त्यांना लांब ठेवण्यात यश मिळवले.

खडसे प्रमाणे विनोद तावडे यांना देखील पक्षाने तिकीट दिले नव्हते. त्यानंतर परळी येथील पंकजा मुंडेंनी आयोजित केलेल्या सभेत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत पक्षाविरोधात बंडाचे निशाण पुन्हा एकदा फडकावले.

विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने त्यांचा पत्ता कट केला. त्यावेळी त्यांनी वरच्या पट्टीत भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांच्या पक्षातील योगदान आणि सिनीअॉरीटीवरुन तोफ डागली होती. तसेच अनेक वेळा आपले मार्ग खुले असल्याचे सांगून पक्षांतराचे सुतोवाचही केले होते. पक्षासाठी दिलेले योगदान आणि त्यांना मिळत असलेली वागणूक यामुळे खडसे भाजपमध्ये अस्वस्थ होते. हे राष्ट्रवादीने जाणले होते. तेथूनच त्यांच्या राष्ट्रवादी प्रेवशाची पायाभरणी होऊ लागली होती.

विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा जोराने होती. मात्र गोपिचंद पडळकरांना संधी मिळाली आणि पुन्हा खडसेंची आशा मावळली. त्यानंतर पक्षात वारंवार डावलले गेल्याने खडसेंनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आणि आज राजीनामा दिला आहे.

शुक्रवारी दुपारी २वाजता प्रवेश करणार-

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या बरोबर येण्याची अनेकांची इच्छा, मात्र कोरोनाच्या काळात निवडणुका घेणे योग्य नाही, त्यांचा प्रवेशही योग्य वेळी होणार.. त्यांच्या संपर्कात अनेक लोकप्रतिनिधी आहेत. भाजपाकडून ज्यांचा हिरमोड झाला ते राष्ट्रवादीत येतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

Last Updated : Oct 21, 2020, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.