ETV Bharat / state

जळगावात शिवसेना नगरसेवकांकडून भाजपचे उपमहापौर सुनील खडके यांचे जल्लोषात स्वागत! - जळगाव महापालिका

'उपमहापौर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १५ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी अनेक विकास कामांची पाहणी करण्याबरोबरच नव्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

BJP Deputy Mayor Sunil Khadke welcomed
उपमहापौर सुनील खडके यांचे जल्लोषात स्वागत
author img

By

Published : Dec 14, 2020, 4:43 PM IST

Updated : Dec 14, 2020, 4:50 PM IST

जळगाव - शहरातील प्रत्येक प्रभागाला भेट देत 'उपमहापौर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत नागरिकांशी चर्चा करीत समस्या जाणून घेत असलेले उपमहापौर सुनील खडके यांचे प्रभाग १५ मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी जल्लोषात स्वागत केले. उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभागात दौरा करून नागरिकांशी चर्चा केली.

'उपमहापौर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १५ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, जयश्री महाजन, मनोज आहुजा, चेतन सनकत, मिनाक्षी पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, अशोक लाडवंजारी, कुंदन काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

उपमहापौर सुनील खडके यांचे जल्लोषात स्वागत
अमृतचे काम लवकर मार्गी लावावे-मेहरूण परिसरात अमृत योजनेच्या चाऱ्या खोदण्यात आल्या असून कामाला सुरुवात झाली आहे. उपमहापौर सुनील खडके यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे सांगितले. उपमहापौरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक आणि दीपमाला चौकाची पाहणी केली. मुख्य रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी रस्त्यांची वेळीच डागडुजी करावी, असेही उपमहापौरांनी सांगितले.सार्वजनिक शौचालयांचे लवकरच लोकार्पण-मेहरूण परिसरातील सार्वजनिक शौचालयांचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी दिली. उपमहापौर सुनील खडके यांनी शौचालयांचे लवकरच लोकार्पण करण्याचे सांगितले. मेहरूणच्या मुख्य नाल्याची पाहणी करीत आवश्यक तिथे संरक्षक भिंत, कठडे उभारण्याच्या सूचना देखील उपमहापौरांनी दिल्या.

उपमहापौरांचे प्रभागात जंगी स्वागत-

प्रभाग १५ मध्ये दौऱ्याला सुरुवात करण्यासाठी उपमहापौर सुनील खडके यांचे आगमन होताच नगरसेवक सुनील महाजन, प्रशांत नाईक यांनी पुष्पहार, गुच्छ देऊन स्वागत केले. उपमहापौर प्रभागात येताच फटाके फोडून आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत त्यांचे औक्षण देखील करण्यात आले. नागरिकांचा प्रचंड रोष असला तरीही उपमहापौर सुनील खडके हे नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. प्रभागात दौरा केल्याने अनेक लहान-मोठे प्रश्न मार्गी लागत आहे. सर्व प्रभागाला भेट देणारे सुनील खडके हे पहिलेच उपमहापौर असावे असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते सुनील महाजन व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी काढले.

Last Updated : Dec 14, 2020, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.