जळगाव - महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. प्रभागातील अतिक्रमण काढण्यात प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी आयुक्तांना घेरावा घातला. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
आयुक्तांचा विरोधात घोषणा
महापालिकेची आज महासभा आयोजित करण्यात आली होती. कोरोनामुळे व्हर्च्युअल सभा घेण्यात येत आहे. यासाठी आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी महापालिकेत आले असताना सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका दिपमाला काळे यांनी त्यांना घेरावा घातला. आयुक्त महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच 'आयुक्तांचा निषेध असो', अशा घोषणा देत त्यांचे वाहन आडवण्यात आले. आयुक्त वाहनातून बाहेर आल्यानंतर नगरसेविका काळे व त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी शिवसेना नगरसेवक बंटी जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नगसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, नगसेवक सचिन पाटील, अतुलसिंग हाडा यांच्यासह बंटी नेरपगारे, केदार देशपांडे, धीरज पाटील, प्रविण राणे, आदी गणेश कॉलनी व ख्वाजामियाँ परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.