ETV Bharat / state

जळगावात भाजपला काँग्रेसचा 'हात', जिल्हा परिषदेत वर्चस्व कायम - , जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व

जिल्हा परिषदेत सत्ता टिकविण्यात भाजपला यश आले आहे. अध्यक्षपदी ऐनपूर-खिरवड गटाच्या सदस्या रंजना प्रल्हाद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नशिराबाद भादली गटाचे सदस्य लालचंद पाटील यांची निवड झाली आहे.

bjp candidates win at jalgaon zp
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व कायम
author img

By

Published : Jan 3, 2020, 5:19 PM IST

Updated : Jan 3, 2020, 5:55 PM IST

जळगाव - जिल्हा परिषदेत सत्ता टिकविण्यात भाजपला यश आले आहे. अध्यक्षपदी ऐनपूर-खिरवड गटाच्या सदस्या रंजना प्रल्हाद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नशिराबाद भादली गटाचे सदस्य लालचंद पाटील यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला याठिकाणी सपशेल अपयशी ठरला. विशेष म्हणजे, भाजपने गेल्या वेळप्रमाणे काँग्रेसला सोबत घेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता मिळवण्याचे मनसुबे उधळून लावले.

जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व कायम

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. दोन्ही पदांसाठी भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून अध्यक्षपदासाठी ऐनपूर-खिरवड गटाच्या रंजना प्रल्हाद पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना सूचक म्हणून नंदा पाटील आणि जयपाल बोदडे होते. तर उपाध्यक्षपदासाठी लालचंद पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचे सूचक म्हणून अनिल देशमुख आणि मधु काटे होते. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्षपदासाठी लोहारा-कुऱ्हाड गटाच्या सदस्या रेखा दिपकसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना सूचक म्हणून नानाभाऊ महाजन आणि मनोहर पाटील होते. तर उपाध्यक्षपदासाठी अमळनेर तालुक्यातील कळमसरे-जळोद गटाच्या सदस्या जयश्री पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून नीलम पाटील आणि स्नेहा गायकवाड होत्या.

जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व कायम

मतदान प्रक्रियेला दुपारी ३ वाजेनंतर सुरुवात झाली. सुरुवातीला माघारीसाठी १० मिनिटे मुदत देण्यात आली. मात्र, कुणीही अर्ज माघारी घेतले नाहीत. त्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात भाजपच्या बाजूने 34 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने 30 मते मिळाली. त्यानंतर पिठासीन अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड जाहीर केली.

जिल्हा परिषदेत भाजपचे आधीच बहुमत होते. तरीही आम्ही गाफील राहिलो नाही. आम्ही एकसंघ राहून निवडणुकीला सामोरे गेलो. ऐनवेळी आमच्या विरोधकांच्या बाजूने एक न्यायालयाचा निकाल लागला. त्यामुळे आमची थोडीफार धावपळ झाली. मात्र, शेवटी आम्ही विजय मिळवल्याची प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली. निकालानंतर जल्लोष साजरा करताना गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकमेकांना मिठाई भरवली.

Intro:जळगाव
जिल्हा परिषदेत सत्ता टिकविण्यात भाजपला यश आले आहे. अध्यक्षपदी ऐनपूर-खिरवड गटाच्या सदस्या रंजना प्रल्हाद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नशिराबाद भादली गटाचे सदस्य लालचंद पाटील यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला याठिकाणी सपशेल अपयशी ठरला. विशेष म्हणजे, भाजपने गेल्या वेळप्रमाणे काँग्रेसला सोबत घेत प्रतिस्पर्धी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता मिळवण्याचे मनसुबे उधळून लावले.Body:जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली दोन्ही पदांसाठी भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून अध्यक्षपदासाठी ऐनपूर-खिरवड गटाच्या रंजना प्रल्हाद पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना सूचक म्हणून नंदा पाटील आणि जयपाल बोदडे होते. तर उपाध्यक्षपदासाठी लालचंद पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचे सूचक म्हणून अनिल देशमुख आणि मधु काटे होते. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्षपदासाठी लोहारा-कुऱ्हाड गटाच्या सदस्या रेखा दीपकसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना सूचक म्हणून नानाभाऊ महाजन आणि मनोहर पाटील होते. तर उपाध्यक्षपदासाठी अमळनेर तालुक्यातील कळमसरे-जळोद गटाच्या सदस्या जयश्री पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून नीलम पाटील आणि स्नेहा गायकवाड होत्या. मतदान प्रक्रियेला दुपारी तीन वाजेनंतर सुरुवात झाली. सुरुवातीला माघारीसाठी 10 मिनिटे मुदत देण्यात आली. मात्र, कुणीही अर्ज माघारी घेतले नाहीत. त्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात भाजपच्या बाजूने 34 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने 30 मते मिळाली. त्यानंतर पिठासीन अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड जाहीर केली.

दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजपचे आधीच बहुमत होते. मात्र, आम्ही तरीही आम्ही गाफील राहिलो नाही. आम्ही एकसंघ राहून निवडणुकीला सामोरे गेलो. ऐनवेळी आमच्या विरोधकांच्या बाजूने एक न्यायालयाचा निकाल लागला. त्यामुळे आमची थोडीफार धावपळ झाली. मात्र, शेवटी आम्ही विजय मिळवला, अशी प्रतिक्रिया भाजपनेते गिरीश महाजन यांनी दिली. निकालानंतर जल्लोष साजरा करताना गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकमेकांना मिठाई भरवली.Conclusion:महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्युला चालू देणार नाही- एकनाथ खडसे

जळगाव जिल्हा परिषदेत भाजपची पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित झाली आहे, याचा आनंद आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. हे आजच्या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा यापुढे कोणताही फॉर्मूला चालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
Last Updated : Jan 3, 2020, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.