जळगाव - महानगर पालिकेच्या उपमहापौरपदी बुधवारी झालेल्या निवडप्रकियेत सुनील खडके यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुनील खडके यांना केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असून, या चार महिन्यात शहरात मनपातंर्गत सुरू असलेल्या कामांची गती वाढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास सुनील खडके यांनी यावेळी व्यक्त केला.
मंगळवारी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करताना सुनील खडके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, त्यांची निवड बिनविरोधच मानली जात होती. बुधवारी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जिल्हाधिकारी तथा निवडणूक पिठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते. खडके यांच्या व्यतिरीक्त अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनील खडके यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली. यावेळी महापौैर भारती सोनवणे यांनी खडके यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपमहापौरांचा सत्कार केला.
जळगाव पालिकेच्या उपमहापौरपदी सुनील खडके बिनविरोध - सुनिल खडके बिनविरोध उपमहापौर
जळगाव महापालिकेच्या उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे उमेदवार सुनिल खडके हे बिनविरोध निवडणूक आले आहेत. खडके यांच्या व्यतिरीक्त अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनील खडके यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली.