ETV Bharat / state

भाजप-सेनेला लोकांना श्रीमंत करण्यातच रस; चंद्रकांत पाटील यांचे जळगावात वक्तव्य

author img

By

Published : Mar 8, 2019, 11:48 PM IST

आमच्या सरकारकडून २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला पक्के घर दिले जाणार आहे. जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे २३०० कोटी रुपये खर्चाच्या भागपूर उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील

जळगाव - जनता अशिक्षित राहावी हाच प्रयत्न काँग्रेसने नेहमी केला. जनता अशिक्षित राहिली, तर ती आपल्या मागे राहणार, असे त्यांना वाटत होते. मात्र, आमच्या सरकारला लोकांना श्रीमंत करण्यात रस आहे. आम्ही जनतेची कामे मते मिळवण्यासाठी करत नाही, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जळगावात केले आहे.

चंद्रकांत पाटील

आमच्या सरकारकडून २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला पक्के घर दिले जाणार आहे. जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे २३०० कोटी रुपये खर्चाच्या भागपूर उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, २०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होतील. तेव्हा एकाही घरात शौचालय नाही, असे असता कामा नये. एकही घर गॅस जोडणी शिवाय असणार नाही, देशात सर्वत्र पक्के रस्ते असावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. आमचे सरकार गरीब आणि कष्टकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

भागपूर उपसा सिंचन योजनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, २३०० कोटी रुपयांची ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात दरवर्षी ६६० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. गेल्या साडेचार वर्षात राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आठ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात सरकारला यश आल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

या सोहळ्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, सुरेश भोळे, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, उन्मेश पाटील, माजी मंत्री एम.के. पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.

Intro:जळगाव

जनता अशिक्षित राहावी हाच प्रयत्न नेहमी काँग्रेसने केला. कारण जनता अशिक्षित राहिली तर ती काँग्रेसच्या मागे राहणार होती. भाजप-सेनेला मात्र लोकांना श्रीमंत करण्यातच अधिक रस आहे. त्याच्यातून मते मिळतील किंवा नाही, हे माहिती नाही. पण 2022 मध्ये या देशात 300 चौरस फुटाचे पक्के घर नाही एकही माणूस असता कामा नये, असा मोदींनी प्रयत्न चालवला आहे, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जळगावात केले आहे.

Body:जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे 2300 कोटी रुपये खर्चाच्या भागपूर उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होतील. तेव्हा एकाही घरात टॉयलेट नाही, असे असता कामा नये, एकही घर गॅस कनेक्शनशिवाय असणार नाही, तसेच देशातील साडेपाच लाख गावांपैकी एकही गाव असे असणार नाही की ज्या गावाला पोहोचायला पक्का रस्ता नाही, असा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालवला आहे. गरीब आणि कष्टकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Conclusion:भागपूर उपसा सिंचन योजनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, 2300 कोटी रुपयांची ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 55 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात दरवर्षी 660 कोटी रुपयांची वाढ होणार आहे. गेल्या साडेचार वर्षात राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आठ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात सरकारला यश आल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

या सोहळ्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, सुरेश भोळे, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, उन्मेश पाटील, माजी मंत्री एम.के. पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.