ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; ५ हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याने शेतकरी हवालदिल

जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. सद्यास्थितीत जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यातील सुमारे 48 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड झालेली आहे. त्यापैकी 70 टक्के क्षेत्रावरील केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून 5 ते 6 हजार हेक्टरवरील केळीचे अतोनात नुकसान झाले आहे.

jalgaon
केळी
author img

By

Published : Nov 30, 2019, 7:19 PM IST

जळगाव- अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातून गेल्याने हवालदिल झालेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा नवे संकट उभे राहिले आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 5 ते 6 हजार हेक्टरवरील केळी बागांना फटका बसला आहे. थंडीचे प्रमाण वाढल्यावर अजून जास्त क्षेत्राला फटका बसण्याची भीती आहे.

माहिती देताना केळी उत्पादक

जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. सद्यास्थितीत जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यातील सुमारे 48 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड झालेली आहे. त्यापैकी 70 टक्के क्षेत्रावरील केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून 5 ते 6 हजार हेक्टरवरील केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता केळीवर आलेल्या करप्याच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जळगाव, यावल आणि रावेर तालुक्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यापुढच्या काळात थंडीचे प्रमाण अधिक वाढेल. त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव विस्तारण्याची भीती आहे. ही शक्यता गृहीत धरून कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकात्मिक रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करायला हवे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

केळीच्या खोडाकडून मुळाद्वारे जमिनीतील घटक अन्नप्रक्रियेत सामावून घेतले जातात. त्यामुळे केळीची वाढ होत असते. मात्र, थंडीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन ही अन्नप्रक्रिया ढासळली आहे. अशा परिस्थितीत पानाद्वारे अन्न मिळविण्याचा खोडाचा प्रयत्न असतो. मात्र, करप्याच्या प्रादुर्भावामुळे पानाद्वारे जे घटक आवश्यक आहेत ते घटक देखील खोडाला उपलब्ध होत नाहीत. परिणामी, केळीची पाने पिवळसर पडणे, पाने जळून चिरा पडणे अशी लक्षणे दिसून येतात. या रोगाचे वेळीच निर्मूलन झाले नाही तर पुढे उत्पादनावर परिणाम होतो.

जिल्ह्यातील बहुसंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांनी करपा रोगाच्या प्रादुर्भाव संदर्भात कृषी विभागाकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्यानुसार लवकरच शेतशिवार पाहणी दौरे, मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यावर्षी जून-जुलै महिन्यात देखील केळी बागांवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. ऊती संवर्धन असलेल्या रोपांच्या केळीवर काही प्रमाणात हा रोग आला होता. मात्र, सुदैवाने त्याचे वेळीच निर्मूलन झाले. या संकटातून बाहेर पडत नाही तोच आता करपा रोगाचे संकट केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

हेही वाचा- जळगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Intro:जळगाव
अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातून गेल्याने हवालदिल झालेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा नवे संकट उभे राहिले आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 5 ते 6 हजार हेक्टरवरील केळी बागांना फटका बसला आहे. थंडीचे प्रमाण वाढल्यावर अजून जास्त क्षेत्राला फटका बसण्याची भीती आहे.Body:जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. सद्यस्थितीत जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यातील सुमारे 48 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड झालेली आहे. त्यापैकी 70 टक्के क्षेत्रावरील केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून 5 ते 6 हजार हेक्टरवरील केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता केळीवर आलेल्या करप्याच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जळगाव, यावल आणि रावेर तालुक्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यापुढच्या काळात थंडीचे प्रमाण अधिक वाढेल. त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव विस्तारण्याची भीती आहे. ही शक्यता गृहीत धरून कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकात्मिक रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करायला हवे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

केळीच्या खोडाकडून मुळाद्वारे जमिनीतील घटक अन्नप्रक्रियेत सामावून घेतले जातात. त्यामुळे केळीची वाढ होत असते. मात्र, थंडीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन ही अन्नप्रक्रिया ढासळली आहे. अशा परिस्थितीत पानाद्वारे अन्न मिळविण्याचा खोडाचा प्रयत्न असतो. मात्र करप्याच्या प्रादुर्भावामुळे पानाद्वारे जे घटक आवश्यक आहेत; ते घटक देखील खोडाला उपलब्ध होत नाहीत. परिणामी, केळीची पाने पिवळसर पडणे, पाने जळून चिरा पडणे अशी लक्षणे दिसून येतात. या रोगाचे वेळीच निर्मूलन झाले नाही तर पुढे उत्पादनावर परिणाम होतो. जिल्ह्यातील बहुसंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांनी करपा रोगाच्या प्रादुर्भाव संदर्भात कृषी विभागाकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्यानुसार लवकरच शेतशिवार पाहणी दौरे, मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.Conclusion:यावर्षी जून-जुलै महिन्यात देखील केळी बागांवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. ऊतीसंवर्धन असलेल्या रोपांच्या केळीवर काही प्रमाणात हा रोग आला होता. मात्र, सुदैवाने त्याचे वेळीच निर्मूलन झाले. या संकटातून बाहेर पडत नाही तोच आता करपा रोगाचे संकट केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

बाईट: शिवाजी चौधरी, केळी उत्पादक (प्लेन शर्ट)
अमोल चौधरी, केळी उत्पादक (लायनिंग शर्ट)
अनिल भोकरे, कृषी उपसंचालक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.