ETV Bharat / state

बहुळा धरण ९० टक्के भरले; पाचोराकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली - heavy rain pachora

बहुळा मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षी १०० टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे हा प्रकल्प ९० टक्के भरला असून परिसरातील शेतकऱ्यांनी यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

बहुळा धरण
बहुळा धरण
author img

By

Published : Aug 19, 2020, 8:36 PM IST

जळगाव- पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या बहुळा मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षी १०० टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे हा प्रकल्प ९० टक्के भरला असून परिसरातील शेतकऱ्यांनी यामुळे आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान प्रशासनाने या प्रकल्पातील २ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र, प्रकल्प भरल्याने पाचोरा शहरासह तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

बहुळा धरण

तालुक्यासाठी संजीवनी असलेल्या बहुळा प्रकल्पावर पाचोरा तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. पाचोरा शहरासह वेरुळी खुर्द, वेरुळी बुद्रुक, वडगाव टेक, वडगाव असेरी, गोराडखेडा खुर्द, गोराडखेडा बुद्रुक, आरवे, लोहारी खुर्द, लोहारी बुद्रुक, वरखेडी, भोकरी, कुऱ्हाड, सांगवी, मोहाडी, साजगाव बिल्दी, खेडगाव (नंदी), पहान, हडसन, वडगाव गुजर, दुसखेडा अशा एकूण २२ ग्रामपंचायतींच्या गावांसह पाचोरा शहरासाठी या मध्यम प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो.

गेले २ दिवस बहुळा नदीच्या उगमस्थानी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने या धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पिंपळगाव हरेश्वर व सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसर व डोंगर माथ्यापासून नदीचे उगमस्थान असल्याने सावखेडा, राजुरी असे तालुक्यातील लहान-मोठे तलाव १०० टक्के भरले आहेत. यामुळे बहुळा मध्यम प्रकल्प ९० टक्के भरले आहे. धरणात लवकरच १०० टक्के पाणीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- सावधान..! बाजारात अप्रमाणित 'सॅनिटायझर'ची सर्रासपणे विक्री, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.