ETV Bharat / state

जळगावात नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर प्राणघातक हल्ला; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार - जळगाव-औरंगाबाद महामार्ग

जळगावात नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र, हल्लेखोर चारचाकीतून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी उभा असलेला नितीन सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.

जळगावात नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर प्राणघातक हल्ला; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार
author img

By

Published : Aug 9, 2019, 8:20 AM IST

Updated : Aug 9, 2019, 9:42 AM IST

जळगाव - नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर पाच जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून तलवार, चॉपरने प्राणघातक हल्ला केला. शहरातील जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील काशिनाथ चौकात बुधवारी दुपारी ही घटना घडली. धुडकू सांडू सपकाळे (वय ४३) व त्यांचे समर्थक गजानन आनंदा देशमुख (वय ५०) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

जळगावात नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर प्राणघातक हल्ला; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार

धुडकू सपकाळे हे नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती आहेत. तसेच ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हमाल, मापाडी कामगार संघटनेचे (भाजीपाला विभाग) देखील अध्यक्ष आहेत. सपकाळे गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीमध्ये हमाल मापाडींचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तर माजी नगरसेवक रवींद्र सपकाळे यांचा मुलगा कॉमेश सपकाळे व भाचे नितीन उर्फ मदन मामा प्रकाश सोनवणे हे देखील बाजार समितीमध्ये कामगार पुरवण्याचे काम करीत आहेत. यामुळे सपकाळे व सोनवणे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे.

दरम्यान बुधवारी दुपारी धुडकू सपकाळे, गजानन देशमुख व संजय चव्हाण हे तिघेजण काशिनाथ चौकातील एका पानटपरीवर उभे होते. यावेळी चारचाकीतून संशयित नितीन सोनवणे, कॉमेश सपकाळे, मयूर सपकाळे व भुरा कोळी यांच्यासह चारचाकी चालक तेथे आले. त्यांनी अचानक सपकाळे व देशमुख यांच्यावर तलवार, चॉपर व बेसबॉलच्या दांड्याने प्राणघातक हल्ला चढवला. यामध्ये सपकाळे यांच्या उजवा हात, कंबर, मांडीवर बेसबॉलच्या दांड्याने मारहाण झाल्यामुळे त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. तर देशमुख यांच्या कपाळ, डोक्यावर वार झाल्यामुळे त्यांचे डोके फुटले. सुमारे दोन ते अडीच मिनिटांच्या या मारहाणीत सपकाळे व देशमुख गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हल्लेखोर चारचाकीतून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी उभा असलेला नितीन सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी जखमी सपकाळे यांचा रुग्णालयात जाऊन जबाब घेतला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णालय, घटनास्थळी गर्दी-
सपकाळे हे भाजप नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती आहेत. औद्योगिक वसाहत परिसरात त्यांचे मोठे वलय आहे. त्यामुळे समर्थकांनी घटनास्थळी, रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी सपकाळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Intro:जळगाव
नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर पाच जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून तलवार, चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारी जळगाव शहरात जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील काशिनाथ चौकात घडली. धुडकू सांडू सपकाळे (वय ४३) व त्यांचे समर्थक गजानन आनंदा देशमुख (वय ५०, दोघे रा. अयोध्यानगर) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. Body:धुडकू सपकाळे हे नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती आहेत. तसेच ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल, मापाडी कामगार संघटनेचे (भाजीपाला विभाग) देखील अध्यक्ष आहेत. सपकाळे गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीमध्ये हमाल मापाडींचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तर माजी नगरसेवक स्व. रवींद्र सपकाळे यांचा मुलगा कॉमेश सपकाळे व भाचे नितीन उर्फ मदन मामा प्रकाश सोनवणे हे देखील बाजार समितीमध्ये कामगार पुरवण्याचे काम करीत आहेत. यामुळे सपकाळे व सोनवणे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी धुडकू सपकाळे, गजानन देशमुख व संजय चव्हाण हे तिघे जण काशिनाथ चौकातील एका पानटपरीवर उभे होते. यावेळी (एमएच १९ बीजे ०१५७) क्रमांकाच्या चारचाकीतून संशयित नितीन सोनवणे, कॉमेश सपकाळे, मयूर सपकाळे व भुरा कोळी यांच्यासह चारचाकी चालक तेथे आले. त्यांनी अचानक सपकाळे व देशमुख यांच्यावर तलवार, चॉपर व बेसबॉलच्या दांड्याने प्राणघातक हल्ला चढवला. यात सपकाळे यांचा उजवा हात, कंबर, मांडीवर बेसबॉलच्या दांड्याने मारहाण झाल्यामुळे त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. तर देशमुख यांचे कपाळ, डोक्यावर वार झाल्यामुळे त्यांचे डोके फुटले. सुमारे दोन ते अडीच मिनिटांच्या या मारहाणीत सपकाळे व देशमुख गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती झाल्यावर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हल्लेखोर चारचाकीतून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी उभा असलेला नितीन सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी जखमी सपकाळे यांचा रुग्णालयात जाऊन जबाब घेतला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:रुग्णालय, घटनास्थळी गर्दी-

सपकाळे हे भाजप नगरसेवका मीना सपकाळे यांचे पती आहेत. औद्योगिक वसाहत परिसरात त्यांचे मोठे वलय आहे. त्यामुळे समर्थकांनी घटनास्थळी, रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी सपकाळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

बाईट: किरण वाघ, पांढरा शर्ट
रवी देशमुख, खिशात मोबाईल
Last Updated : Aug 9, 2019, 9:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.