ETV Bharat / state

अँड्रॉइड मोबाइल नसल्याने कृषी सहाय्यकांचा बहिष्कार

कृषी सहाय्यक अनेक प्रकारची ऑनलाइन अ‍ॅपद्वारे काम करीत आहेत. बहुतेक कृषी सहाय्यकांकडे नव्या व्हर्जनचा मोबाइल नसल्याने सपोर्ट करीत नाही. संघटनेकडून वारंवार लॅपटॉप, टॅबची मागणी करूनही ती पूर्ण झालेली नाही. या कारणास्तव कृषी सहाय्यकांनी क्रॉपसॅपच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.

जळगाव न्यूज  जळगाव कृषी न्यूज  agri assistant news  Jalgaon news  android mobile news
अँड्रॉइड मोबाइल नसल्याने कृषी सहायकांचा बहिष्कार
author img

By

Published : Aug 19, 2020, 4:13 PM IST

जळगाव - कृषी विभागाची अनेक कामे ऑनलाइन करावी लागत आहेत. मात्र, बहुतेक कृषी सहाय्यकांकडे चांगला अँड्रॉइड मोबाइल नसल्याने काम करण्यात अडचणी येत आहेत. या कारणास्तव कृषी सहाय्यकांनी क्रॉपसॅपच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. या विषयाबाबत राज्य कृषी सहाय्यक संघटना आक्रमक झाली आहे. अँड्रॉइड मोबाइल अभावी येणाऱ्या अडचणी सोडवण्याची संघटनेची मागणी आहे.

कृषी सहाय्यक ऑनलाइन अ‍ॅपव्दारे अनेक प्रकारचे काम करीत आहेत. बहुतेक कृषी सहाय्यकांकडे नव्या व्हर्जनचा मोबाइल नसल्याने सपोर्ट करीत नाही. संघटनेकडून वारंवार लॅपटॉप, टॅबची मागणी करूनही ती पूर्ण झालेली नाही. कृषी सहाय्यकांना इतर योजनांच्या अंमलबजावणीमुळे व अतिरिक्त पदभारामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत प्रकल्प व मिनी किटच्या जियो टॅगिंगचे काम करणे अशक्य होत आहे.

राज्य कृषी सहाय्यक संघटना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रकल्प व मिनी किटच्या जिओ टॅगिंगच्या व अतिरिक्त पदभारातील क्रॉपसॅपच्या कामावर नाईलाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी सहाय्यक बहिष्कार टाकीत आहोत, असे संघटनेनं स्पष्ट केले आहे.

याविषयासंदर्भात नुकतेच संघटनेतर्फे तालुका कृषी अधिकारी सचिन बऱ्हाटे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन बाविस्कर, उपाध्यक्ष प्रवीणराज सोनवणे, सचिव दीपक धनगर, योगेश इंगळे, वैशाली कोळी, सुरेखा सपकाळे, मनीषा कोंघे, सुनीता मोरे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.