ETV Bharat / state

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतरही खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा सस्पेन्स कायम - Jalgaon_khadse

एकनाथ खडसे खडसेंच्या प्रवेशाने पक्षासाठी नेमकी कशी स्थिती निर्माण होईल, कोणत्या मतदारसंघांवर त्याचा प्रभाव पडेल, खडसेंना पक्षात प्रवेश दिल्यावर काय काय प्रभाव पडतील, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबत जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाजूने आपली मते शरद पवारांकडे मांडली. मात्र, अखेरचा निर्णय घेण्यात आला नाही.

eknath khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Sep 23, 2020, 11:15 PM IST

Updated : Sep 24, 2020, 4:47 AM IST

जळगाव - भारतीच जनता पक्षाचे माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील कथित प्रवेशाबाबत बुधवारी मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतरही सस्पेन्स कायम आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत खडसेंच्या प्रवेशाबाबत चाचपणी झाल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी बैठकीत खडसेंबाबत संमिश्र मत दिल्याचे सांगितले जात आहे. खडसेंनी मात्र, 'याबाबत मला काहीही माहिती नाही. ज्यांची बैठक होती त्यांनाच विचारा?' अशा शब्दात या राजकीय चर्चेचे खंडन केले आहे.

एकनाथ खडसे, माजी मंत्री

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मंत्रीमंडळातून राजीनामा दिल्यापासून ते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी नाकारल्यावर व नंतरही त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. अलीकडेच शिवसेना नेते तथा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, अब्दुल सत्तार यांनी त्यांना सेनेची ऑफर दिली. तर राष्ट्रवादीतही खडसेंचे स्वागत करुन, अशी भूमिका नेत्यांनी घेतली. त्यामुळे खडसेंविषयी खूप चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादीची मुंबईची बैठक ठरली निरर्थक?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 23 रोजी जळगाव दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द होऊन जिल्ह्यातील प्रश्‍नांबाबत मुंबईतच पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जळगाव जिल्ह्यातून माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप वाघ आदी उपस्थित होते.

खडसेंच्या प्रवेशाने पक्षासाठी नेमकी कशी स्थिती निर्माण होईल, कोणत्या मतदारसंघांवर त्याचा प्रभाव पडेल, खडसेंना पक्षात प्रवेश दिल्यावर काय काय प्रभाव पडतील, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबत जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाजूने आपली मते शरद पवारांकडे मांडली. मात्र, अखेरचा निर्णय घेण्यात आला नाही. शरद पवारांनी सर्व बाजूंनी चाचपणी केल्यानंतर पुढे पाहूया, असे सांगितल्याचे समजते.

Last Updated : Sep 24, 2020, 4:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.