ETV Bharat / state

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रा

author img

By

Published : Dec 12, 2019, 7:53 PM IST

समस्त लाडवंजारी समाज तसेच श्रीराम मंदिर संस्थानतर्फे ही शोभायात्रा काढण्यात आली. यासोबतच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवानी ढोल व ताशांच्या गजरात जल्लोष करीत गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष केला. महिला पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.

munde
गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त जळगावात निघाली भव्य शोभायात्रा

जळगाव - दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी जळगाव शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत शालेय विद्यार्थी, समाजबांधवांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रा

समस्त लाडवंजारी समाज तसेच श्रीराम मंदिर संस्थानातर्फे ही शोभायात्रा काढण्यात आली. यासोबतच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सर्वप्रथम शिवतीर्थ मैदानावर गोपीनाथ मुंडे यांच्या भव्य प्रतिमेला महापालिका आयुक्त उदय टेकाळे, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी सहभाग नोंदवत लेझीम नृत्य केले. समाजबांधवानी ढोल व ताशांच्या गजरात जल्लोष करीत गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष केला. महिला पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा - 'आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय.. संघर्षाचा.. जनसामान्यांच्या कल्याणाचा'

शोभायात्रेत दीड हजारपेक्षा अधिक समाजबांधव, नागरिकांनी उपस्थिती दिली. त्यानंतर लाडवंजारी मंगल कार्यालयात इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी उत्स्फुर्तपणे ३५ जणांनी रक्तदान केले. शोभायात्रा संपल्यानंतर जालना येथील शिवव्याख्याते उद्धव गीते यांचे 'गोपीनाथरावजी मुंडे – एक संघर्ष' याविषयावर व्याख्यान झाले.

Intro:जळगाव
दिवंगत माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी जळगाव शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत शालेय विद्यार्थी, समाजबांधवांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.Body:समस्त लाडवंजारी समाज तसेच श्रीराम मंदिर संस्थानातर्फे ही शोभायात्रा काढण्यात आली. या सोबतच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सर्वप्रथम शिवतीर्थ मैदानावर गोपीनाथ मुंडे यांच्या भव्य प्रतिमेला महापालिका आयुक्त उदय टेकाळे, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी सहभाग नोंदवत लेझीम नृत्य केले. समाजबांधवानी ढोल व ताशांच्या गजरात जल्लोष करीत गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष केला. महिला पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.Conclusion:शोभायात्रेत दीड हजारपेक्षा अधिक समाजबांधव, नागरिकांनी उपस्थिती दिली. त्यानंतर लाडवंजारी मंगल कार्यालयात इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी उत्स्फुर्तपणे ३५ जणांनी रक्तदान केले. शोभायात्रा संपल्यानंतर जालना येथील शिवव्याख्याते उद्धव गीते यांचे 'गोपीनाथरावजी मुंडे – एक संघर्ष' याविषयावर व्याख्यान झाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.