ETV Bharat / state

जळगाव भाजपमध्ये बंडखोरी, ९ नगरसेवकांनी बांधले शिवबंधन!

author img

By

Published : Mar 15, 2021, 5:38 PM IST

Updated : Mar 15, 2021, 7:41 PM IST

जळगाव मनपातील सत्ताधारी भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांपैकी ९ नगरसेवकांनी सोमवारी दुपारी मुंबईत मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले.

jalgaon
जळगाव महापालिका

जळगाव - महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने सत्तासंघर्ष सुरू आहे. या सत्तासंघर्षाच्या दुसऱ्या दिवशी देखील मुंबईत जोरदार घडामोडी घडल्या. मनपातील सत्ताधारी भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांपैकी ९ नगरसेवकांनी सोमवारी दुपारी मुंबईत मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले.

एकनाथ खडसे - नेते, राष्ट्रवादी

हेही वाचा - जळगावात भाजप नेते गिरीश महाजनांना धक्का; महापौर निवडीपूर्वीच भाजपचे 30 नगरसेवक 'नॉट रिचेबल'

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत व रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील या सत्तासंघर्षाच्या बाबतीत मत मांडताना 'भाजपने विकासाचा शब्द न पाळला नाही. जसे नागरिक भाजपवर नाराज होते, तसे भाजपचे नगरसेवकही नाराज होते. त्यात असा उद्रेक होणे स्वाभाविक होते', अशी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

या नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश-

महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक अवघ्या ४ दिवसांवर असताना सत्ताधारी भाजपमध्ये मोठी फुट पडली आहे. २७ नगरसेवक रविवारी मुंबईला रवाना झाले होते. त्यापैकी ९ नगरसेवकांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, ॲड. दिलीप पोकळे, चेतन सनकत, गजानन देशमुख, नगरसेविका पती सुधीर पाटील, कुंदन काळे, भरत कोळी, किशोर बाविस्कर यांचा समावेश आहे. इतर नगरसेवकांनी अद्याप पक्षांतर केले नसले तरी ३० नगरसेवक आमच्या सोबत असल्याचा दावा कुलभूषण पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा - विशेष : महामृत्यूंजय मंत्राच्या जपाने बरा होतो कोरोना; जळगावातील योगशिक्षकाचा अजब दावा

नेत्यांनी आम्हाला बेदखल केले, म्हणून निर्णय घ्यावा लागला-

कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमदार गिरीश महाजन व सुरेश भोळे यांच्याकडे अमृत योजना व वॉटरग्रेसच्या गैरकारभाराबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आमच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आम्हाला दूर ठेवण्यात येत असल्याचाही आरोपही या नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान, स्वयंस्फुर्तीने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही नेत्याने यासाठी प्रयत्न केलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

खडसेंनी साधला भाजपवर निशाणा-

महापालिकेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन तसेच भाजपवर थेट निशाणा साधला. खडसे सोमवारी दुपारी जळगावात आले होते. यावेळी पत्रकारांजवळ भूमिका मांडताना खडसे म्हणाले की, जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. परंतु, गेल्या अडीच वर्षांत शहरात कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. शहराला मागे नेण्याचे काम भाजपने केले. शहराच्या विकासाचा जो शब्द भाजपने दिला होता; तो पाळण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक तसेच नगरसेवक नाराज होते. अशा परिस्थितीत नाराज नगरसेवकांचा उद्रेक होणे स्वाभाविक होते. तीन-चार दिवसांपूर्वी भाजपचे नाराज नगरसेवक मला भेटले होते. यावेळी त्यांनी मला सत्तांतराबाबत भूमिका बोलून दाखवली होती. विकासाच्या दृष्टीने अशा पद्धतीने सत्तांतर होत असेल तर त्याला आपला पाठिंबा असल्याचे आपण त्यांना सांगितले होते. आता भाजपचे २७ बंडखोर नगरसेवक, शिवसेनेचे १५ नगरसेवक आणि एमआयएमचे ३ नगरसेवक असे मिळून साधारण ४५ ते ४६ नगरसेवकांचा एक गट सोबत असल्याचे सूतोवाच एकनाथ खडसेंनी यावेळी केले.

Last Updated : Mar 15, 2021, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.