ETV Bharat / state

जळगाव घरकुल घोटाळ्यातील ८ आरोपींना जामीन मंजूर

तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या बहुचर्चित घरकुल घोटाळ्यातील आठ आरोपींना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर राजेंद्र मयूर व जगन्नाथ वाणी यांनी निकालापूर्वीच पुढची तारीख मागून घेतली होती.

jalgaon
जळगाव घरकुल घोटाळ्यातील ८ आरोपींना जामीन मंजूर
author img

By

Published : Nov 27, 2019, 8:34 PM IST

जळगाव- तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या बहुचर्चित घरकुल घोटाळ्यातील आठ आरोपींना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर, राजेंद्र मयूर व जगन्नाथ वाणी यांनी निकालापूर्वीच पुढची तारीख मागून घेतली होती. त्यांच्या अर्जावर ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने माजी महापौर प्रदीप रायसोनी, महेंद्र सपकाळे, सुधा काळे, साधना कोगटा, अलका लढ्ढा, लता भोईटे, मीना वाणी व विजय कोल्हे या आठ जणांना जामीन मंजूर केला. कोट्यवधी रुपयांच्या घरकुल घोटाळ्याचा निकाल ३१ ऑगस्ट २०१९ रोजी धुळे विशेष न्यायालयाने दिला होता. यात सर्व ४९ आरोपींना न्यायालयाने दोषी धरून शिक्षा ठोठावली होती. घरकुल घोटाळ्यात ४७ कोटी ४० लाख ७९ हजार ९४७ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. शिक्षा ठोठावल्यानंतर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

यानंतर काही आरोपींची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इतर काही आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल करून जामीन मिळवली. तर, उर्वरित आरोपींनी जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घ्यावी, असा अर्ज दिला होता. त्यानुसार उर्वरित आरोपींच्या जामिनावर मुंबईत सुनावणी सुरू आहे. तत्पूर्वी गेल्या आठवड्यात माजी मंत्री सुरेश जैन यांना वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, राजेंद्र मयूर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जावर देखील बुधवारी निर्णय होणार होता. परंतु, त्यांच्या वकिलांनी निकालापूर्वीच पुढची तारीख मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ३ डिसेंबर ही तारीख दिली आहे.

हेही वाचा- पैसे देण्यासाठी लेखी मुदत मागितल्याने जळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांच्या वाहनासह साहित्याची जप्ती टळली

Intro:जळगाव
तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या बहुचर्चित घरकुल घोटाळ्यातील आठ आरोपींना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केले. तर राजेंद्र मयूर व जगन्नाथ वाणी यांनी निकालापूर्वीच पुढची तारीख मागून घेतली होती. त्यांच्या अर्जावर ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.Body:बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने माजी महापौर प्रदीप रायसोनी, महेंद्र सपकाळे, सुधा काळे, साधना कोगटा, अलका लढ्ढा, लता भोईटे, मीना वाणी व विजय कोल्हे या आठ जणांना जामीन मंजूर केला. कोट्यवधी रुपयांच्या घरकुल घाेटाळ्याचा निकाल ३१ ऑगस्ट २०१९ रोजी धुळे विशेष न्यायालयाने दिला होता. यात सर्व ४९ आरोपींना न्यायालयाने दोषी धरुन शिक्षा ठोठावली होती. घरकुल घोटाळ्यात ४७ कोटी ४० लाख ७९ हजार ९४७ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. शिक्षा ठोठावल्यानंतर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. यानंतर काही आरोपींची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इतर काही आराेपींनी औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल करुन जामीन मिळवले. तर उर्वरित आरोपींनी जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घ्यावी, असा अर्ज दिला होता. त्यानुसार उर्वरित आरोपींच्या जामिनावर मुंबईत सुनावणी सुरू आहे. तत्पूर्वी गेल्या आठवड्यात माजीमंत्री सुरेश जैन यांना वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे.Conclusion:दोघांनी घेतली पुढची तारीख-

दरम्यान, राजेंद्र मयूर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जावर देखील बुधवारी निर्णय होणार होता. परंतु, त्यांच्या वकिलांनी निकालापूर्वीच पुढची तारीख मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ३ डिसेंबर ही तारीख दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.