ETV Bharat / state

१२० कोटींच्या केटामाईनच्या तस्करीप्रकरणी ७ जण दोषी, जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

मुंबई येथील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) पथकाने १२ डिसेंबर २०१३ रोजी जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारातील आयोसिंथेटीक या कंपनीवर छापा मारला होता. यावेळी तेथे एका कारमध्ये प्रत्येकी ४५ किलोग्रॅम वजनाच्या केटामाईनच्या चार गोण्या मिळून आल्या होत्या.

१२० कोटींच्या केटामाईनच्या तस्करीप्रकरणी ७ जण दोषी, जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
author img

By

Published : Apr 18, 2019, 12:18 PM IST

जळगाव - १२० कोटी रुपये किंमतीच्या केटामाईनची तस्करी केल्याप्रकरणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी धरले. तर ५जणांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल ५ वर्षांपासून हा खटला सुरू होता. दोषी आरोपींना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

१२० कोटींच्या केटामाईनच्या तस्करीप्रकरणी ७ जण दोषी, जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

वरूण कुमार तिवारी (वय ४२, रा. विक्रोळी, मुंबई), जी. श्रीनिवास राव (वय ५२, रा. पवई, मुंबई), नितीन चिंचोले (वय ५६, रा. जळगाव), विकास पुरी (वय ४८, रा. पवई, मुंबई), खेमा मधुकर झोपे (वय ४७, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), रजनीश ठाकूर (वय ५०, रा. सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) व एस.एम. सेन्थीलकुमार (वय ४०, रा. चेन्नई) या 7 जणांना दोषी धरण्यात आले आहे. गौरी प्रसाद पाल (वय ५६, रा. विक्रोळी, मुंबई), नित्यानंद थेवर (वय ३२, रा. धारावी, मुंबई), कांतीलाल उत्तम सोनवणे (वय ३४, रा. उमाळा, जळगाव), विशाल सोमनाथ पुरी (वय ४५ , रा. जनकनगरी, नवी दिल्ली) व विलास रामचंद्र चिंचोले (वय ६८, रा. जळगाव) या ५ जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण -

मुंबई येथील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) पथकाने १२ डिसेंबर २०१३ रोजी जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारातील आयोसिंथेटीक या कंपनीवर छापा मारला होता. यावेळी तेथे एका कारमध्ये प्रत्येकी ४५ किलोग्रॅम वजनाच्या केटामाईनच्या चार गोण्या मिळून आल्या होत्या. मिळालेल्या माहितीवरून लागलीच धुळे येथे एका हॉटेलमध्ये छापा मारुन वरुण तिवारी याला ताब्यात घेण्यात आले होते. धुळ्यातून ही एक चारचाकी जप्त केली होती. त्यातही केटामाईन मिळून आले होते. रात्रभरातून एकूण १ हजार १७५ किलो केटामाईन या पथकाने जप्त केले होते. या प्रकरणी काही दिवस पोलिसांनी चौकशी करुन एकूण १२ संशयितांना अटक केली होती.

साक्षीदार तपासले -

या प्रकरणी ३ सप्टेंबर २०१६ रोजी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. डीआयआयतर्फे अॅड. अतुल सरपांडे व जळगावचे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संभाजी पाटील यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण ४४ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने ७ आरोपींना दोषी ठरवले. त्यांना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Intro:जळगाव
120 कोटी रुपये किंमतीच्या केटामाईनची तस्करी केल्याप्रकरणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने 12 पैकी 7 आरोपींना दोषी धरले. तर 5 जणांची निर्दाेष मुक्तता केली. तब्बल 5 वर्षांपासून हा खटला सुरू होता. दोषी आरोपींना 22 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.Body:वरूण कुमार तिवारी (वय 42, रा. विक्रोळी, मुंबई), जी. श्रीनिवास राव (वय 52, रा. पवई, मुंबई), नितीन चिंचोले (वय 56, रा. जळगाव), विकास पुरी (वय 48, रा. पवई, मुंबई), खेमा मधुकर झोपे (वय 47, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), रजनीश ठाकूर (वय 50, रा. सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) व एस.एम. सेन्थीलकुमार (वय 40, रा. चेन्नई) या 7 जणांना दोषी धरण्यात आले आहे. तर गौरी प्रसाद पाल (वय 56, रा. विक्रोळी, मुंबई), नित्यानंद थेवर (वय 32, रा. धारावी, मुंबई), कांतीलाल उत्तम सोनवणे (वय 34, रा. उमाळा, जळगाव), विशाल सोमनाथ पुरी (वय 45, रा. जनकनगरी, नवी दिल्ली) व विलास रामचंद्र चिंचोले (वय 68, रा. जळगाव) या 5 जणांना निर्दाेष सोडण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण-

मुंबई येथील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) पथकाने 12 डिसेंबर 2013 रोजी जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारातील आयोसिंथेटीक या कंपनीत छापा मारला होता. यावेळी तेथून एका कारमध्ये प्रत्येकी 45 किलोग्रॅम वजनाच्या केटामाईनच्या चार गोण्या मिळून आल्या होत्या. मिळालेल्या माहितीवरून लागलीच धुळे येथे एका हॉटेलमध्ये छापा मारुन वरुण तिवारी याला ताब्यात घेण्यात आले होते. धुळ्यातून देखील एक चारचाकी जप्त केली होती. त्यातही केटामाईन मिळून आले होते. रात्रभरातून एकूण 1 हजार 175 किलो केटामाईन या पथकाने जप्त केले होते. यानंतर काही दिवस पोलिसांनी चौकशी करुन एकूण 12 संशयितांना अटक केली होती.Conclusion:44 साक्षीदार तपासले-

या प्रकरणी 3 सप्टेंबर 2016 रोजी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. डीआयआयतर्फे अॅड. अतुल सरपांडे व जळगावचे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संभाजी पाटील यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण 44 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने 7 आरोपींना दोषी ठरवले. त्यांना 22 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.