ETV Bharat / state

उष्माघाताने ६८ मेंढ्या दगावल्या, जळगावच्या पाचोरा येथील घटना

जळगाव जिल्ह्यात उन्हाने मर्यादा ओलांडली आहे. तापमानाचा पारा ४६ ते ४७ अंश सेल्सिअसरवर गेला आहे. प्रचंड उन्हामुळे लोकांना याचा त्रास होत आहे. जनावरे देखील यापासून सुटली नाही. याचेच उदाहरण पाचोरा तालुक्यात दिसून आले. डोंगरगाव रस्त्यालगतच्या पाट चारीजवळ ६८ मेंढ्यांनी आपले प्राण सोडले आहेत. त्यांचा जीव उष्माघाताने गेल्याचे सांगण्यात येत आहे.

author img

By

Published : Apr 30, 2019, 9:00 AM IST

मृत मेंढ्यांशेजारी बसलेले मेंढपाळ

जळगाव - उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. याचा फटका जनावरांनाही बसू लागला आहे. पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे ६८ मेंढ्या उष्माघाताने दगावल्याचे समोर आले आहे. एवढ्या मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मेंढ्या दगावल्याने मेंढपाळ भावनावश झाले

जळगाव जिल्ह्यात उन्हाने मर्यादा ओलांडली आहे. तापमानाचा पारा ४६ ते ४७ अंश सेल्सिअसरवर गेला आहे. प्रचंड उन्हामुळे लोकांना याचा त्रास होत आहे. जनावरे देखील यापासून सुटली नाही. याचेच उदाहरण पाचोरा तालुक्यात दिसून आले. डोंगरगाव रस्त्यालगतच्या पाट चारीजवळ ६८ मेंढ्यांनी आपले प्राण सोडले आहेत. त्यांचा जीव उष्माघाताने गेल्याचे सांगण्यात येत आहे.

नगरदेवळा येथील रतन म्हसू खांडेकर यांच्या मालकीच्या या मेंढ्या आहेत. सोमवारी दुपारी दीड वाजता खडकदेवळा धरणाच्या पाटचारीत या मेंढ्या पाणी पिण्यासाठी आल्या होत्या. याचवेळी तडफडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती झाल्यानंतर पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त मेंढपाळांना मदतीचे आश्वासन दिले. या घटनेमुळे रतन खांडेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दुष्काळात खांडेकर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या पाहून खांडेकर यांना रडू कोसळले.

Intro:जळगाव
जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा ४६ ते ४७ अंशावर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव रस्त्यालगत असळलेल्या पाटचारीजवळ उष्माघाताने ६८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने खळबळ माजली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याने मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.Body:नगरदेवळा येथील रतन म्हसू खांडेकर यांच्या मालकीच्या या मेंढ्या आहेत. आज दुपारी दीड वाजेला खडकदेवळा धरणाच्या पाटचारीत या मेंढ्या पाणी पिण्यासाठी आल्या होत्या. याचवेळी तडफडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती झाल्यानंतर पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त मेंढपाळांना मदतीच्या सूचना दिल्या.Conclusion:या घटनेमुळे रतन खांडेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन दुष्काळात खांडेकर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळलं आहे. मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या पाहून खांडेकर यांना रडू कोसळले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.