ETV Bharat / state

बुधवार ठरला अपघातवार; २ अपघातात तिघे ठार - अपघात

पिकअप गाडीचे पुढचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट समोरुन येणाऱ्या टँकरवर आदळली. या अपघातात पिकअप गाडीतील दोघे भाऊ जागीच ठार तर इतर २ जण जखमी झाले. बुधवारी दुपारी १ वाजता राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक सहावर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे ते मराठखेडे गावादरम्यान हा अपघात झाला.

accident
दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 22, 2020, 10:31 PM IST

Updated : Jan 22, 2020, 11:47 PM IST

जळगाव - जिल्ह्यासाठी बुधवार हा अपघातवार ठरला असून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे गावाजवळ घडला. या अपघातात जळगावातील दोघे भाऊ ठार झाले. तर दुसरा अपघात भुसावळ शहराजवळ घडला. त्यात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाला आपले प्राण गमवावे लागले.

accident
अपघात

हेही वाचा - निर्भया प्रकरण : फाशीची शिक्षा झालेल्या दोषींच्या हक्कांमध्ये सुधारणा करण्याची सरकारची मागणी..

पिकअप गाडीचे पुढचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट समोरुन येणाऱ्या टँकरवर आदळली. या अपघातात पिकअप गाडीतील दोघे भाऊ जागीच ठार तर इतर २ जण जखमी झाले. बुधवारी दुपारी १ वाजता राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक सहावर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे ते मराठखेडे गावादरम्यान हा अपघात झाला. इकबाल मोहम्मद ताहीर मनियार (वय २७) आणि अलताफ मोहम्मद ताहीर मनियार (वय ३२, दोघे रा. मासुमवाडी, जळगाव) अशी मृत भावंडांची नावे आहेत. या अपघातात पिकअप गाडीचा चालक वसीम पटेल (वय ३२, रा. जळगाव) आणि टँकरचालक देखील जखमी झाला आहे. इकबाल आणि अलताफ हे दोघे भाऊ विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन यात्रा, उत्सवात गृहोपयोगी वस्तू विक्रीचे काम करायचे. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांचे वडील ताहीर मनियार हे सकाळी धुळे जिल्ह्यातील रामबोरीस येथील यात्रेत वस्तू विक्रीसाठी जागा मिळवण्यासाठी निघून गेले. त्यानंतर इकबाल आणि अलताफ हे माहेजी (ता. पाचोरा) येथील यात्रा आटोपून उर्वरित माल धुळ्यातील यात्रेत विकण्यासाठी पिकअप गाडीने (एमएच १५ एफव्ही २३८१) निघाले होते. पातरखेडे ते मराठखेडे दरम्यान गाडीचे टायर अचानक फुटल्यामुळे चालक वसीम पटेल याचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर पिकअप गाडी थेट समोरुन येणाऱ्या टँकरवर (एमएच ४८ जे ०५२२) आदळली. या अपघातात इकबाल आणि अलताफ हे दोघे भाऊ जागीच ठार झाले. तर दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पारोळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोबत असलेल्या कागदपत्रांवरुन दोन्ही भावंडांची ओळख पटली. यानंतर मृतदेह पारोळा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते.

accident
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

हेही वाचा - धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलीला पाण्यात बुडवून मातेने घेतले पेटवून

तर दुसरा अपघात भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गॅस एजन्सीसमोर झाला. ट्रक आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, रा. श्रीनगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात चेतन भरत चौधरी (वय २७, रा. श्रीनगर) हा गंभीर जखमी झाला. चौधरीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालक ललित कोळी (रा. नेरी नाका, जळगाव) याला ट्रकसह बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Intro:जळगाव
जिल्ह्यासाठी बुधवार हा अपघातवार ठरला. २ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे गावाजवळ घडला. या अपघातात जळगावातील दोघे भाऊ ठार झाले. तर दुसरा अपघात भुसावळ शहराजवळ घडला. त्यात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाला आपले प्राण गमवावे लागले.Body:पिकअप गाडीचे पुढचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट समोरुन येणाऱ्या टँकरवर आदळली. या अपघातात पिकअप गाडीतील दोघे भाऊ जागीच ठार तर इतर २ जण जखमी झाले. बुधवारी दुपारी १ वाजता राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक सहावर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे ते मराठखेडे गावादरम्यान हा अपघात झाला. इकबाल मोहम्मद ताहीर मनियार (वय २७) व अलताफ मोहम्मद ताहीर मनियार (वय ३२, दोघे रा. मासुमवाडी, जळगाव) अशी मृत भावंडांची नावे आहेत. या अपघातात पिकअप गाडीचा चालक वसीम पटेल (वय ३२, रा. जळगाव) व टँकरचालक देखील जखमी झाला आहे. इकबाल व अलताफ हे दोघे भाऊ विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन यात्रा-उत्सवात गृहोपयोगी वस्तू विक्रीचे काम करीत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांचे वडील ताहीर मनियार हे सकाळी धुळे जिल्ह्यातील रामबोरीस येथील यात्रेत वस्तू विक्रीसाठी जागा मिळवण्यासाठी निघून गेले. त्यानंतर इकबाल व अलताफ हे माहेजी (ता. पाचोरा) येथील यात्रा आटोपून उर्वरित माल धुळ्यातील यात्रेत विकण्यासाठी पिकअप गाडीने (एमएच १५ एफव्ही २३८१) निघाले होते. पातरखेडे ते मराठखेडे दरम्यान गाडीचे टायर अचानक फुटल्यामुळे चालक वसीम पटेल याचा ताबा सुटला. यानंतर पिकअप गाडी थेट समोरुन येणाऱ्या टँकरवर (एमएच ४८ जे ०५२२) आदळली. या अपघातात इकबाल व अलताफ हे दोघे भाऊ जागीच ठार झाले. तर दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पारोळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोबत असलेल्या कागदपत्रांवरुन दोन्ही भावंडांची ओळख पटली. यानंतर मृतदेह पारोळा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते.Conclusion:भुसावळजवळ अपघातात १ ठार-

भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गॅस एजन्सीसमोर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, रा. श्रीनगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात चेतन भरत चौधरी (वय २७, रा. श्रीनगर) हा गंभीर जखमी झाला. चौधरी यास येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ट्रकचालक ललित कोळी (रा. नेरी नाका, जळगाव) यास ट्रकसह बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
Last Updated : Jan 22, 2020, 11:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.