ETV Bharat / state

जळगावात आणखी तिघांना कोरोनाची लागण, रुग्णसंख्या 14वर - जळगाव कोरोना अपडेट

कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने जळगाव जिल्हा रुग्णालयात 21 एप्रिलला काही कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 3 रुग्णांचे अहवाल आज दुपारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले असून तिघेही कोरोनाबाधित आहेत.

jalgaon corona update  jalgaon corona positive patient  जळगाव कोरोना अपडेट  कोरोना अपडेट
जळगावात आणखी तिघांना कोरोनाची लागण, रुग्णसंख्या पोहोचली 14 वर
author img

By

Published : Apr 25, 2020, 5:39 PM IST

जळगाव - जिल्ह्यात शनिवारी आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 14 वर पोहोचली असून, मागील आठवड्यात ग्रीन झोनच्या वाटेवर असलेला जिल्हा आता रेड झोनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने जळगाव जिल्हा रुग्णालयात 21 एप्रिलला काही कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 3 रुग्णांचे अहवाल आज दुपारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले असून तिघेही कोरोनाबाधित आहेत. लागण झालेल्या या 3 रुग्णांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भुसावळ येथील एक 43 वर्षीय महिला व अमळनेर येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली आहे. यापैकी जळगावातील मेहरूण परिसरातील एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे, तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून, उर्वरित 10 रुग्ण कोरोना कक्षात उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील दिशा बदलली -

आज कोरोनाबाधित म्हणून अहवाल आलेल्या तिघांना लागण कशी झाली? याबाबत ठोस माहिती पुढे आलेली नाही. त्यांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री काय आहे, ते एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले आहेत का? याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून काढली जात आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील दिशा बदलल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जळगाव, त्यानंतर अमळनेर शहर आणि तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र, आता भुसावळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी आढळले रुग्ण -
जळगावातील अमळनेर येथील एकाच कुटुंबातील तब्बल 5 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी 3 संशयित रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वेगाने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

कोरोनाची आकडेवारी दृष्टीक्षेपात -

  • एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या - 14
  • जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण - 10
  • कोरोनातून बरे झालेले रुग्ण - 1
  • कोरोनामुळे झालेले मृत्यू - 3

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.