ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी अर्जांचा पाऊस; २१ जागांसाठी २७९ अर्ज

स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजप या निवडणुकीत बॅकफूटवर आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून सर्व २१ जागांवर लढण्याचा दावा केला जात होता. मात्र, भाजपला ४ जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. पारोळा, एरंडोल, धरणगाव आणि बोदवडला भाजपने उमेदवार दिलेला नाही.

jalgaon ddc bank election
जळगाव जिल्हा बँक निवडणूक
author img

By

Published : Oct 19, 2021, 12:58 AM IST

Updated : Oct 19, 2021, 2:38 AM IST

जळगाव - जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडला. एकूण २१ जागांसाठी २७९ अर्ज दाखल झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आमने-सामने असल्याने अनेक दिग्गजांनी एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले असून, तगड्या लढती रंगणार आहेत.

संबंधितांचा माध्यमांशी संवाद

भाजप बॅक फूटवर -

स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजप या निवडणुकीत बॅकफूटवर आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून सर्व २१ जागांवर लढण्याचा दावा केला जात होता. मात्र, भाजपला ४ जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. पारोळा, एरंडोल, धरणगाव आणि बोदवडला भाजपने उमेदवार दिलेला नाही. भाजपकडून सोमवारी माजीमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, माजी खासदार ए. टी. पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पाटील या दिग्गजांनी अर्ज दाखल केले.

खडसे नणंद-भावजयी आमने-सामने?

खासदार रक्षा खडसे यांनीदेखील भाजपकडून ओबीसी मतदारसंघ व महिला राखीव मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍड. रोहिणी खडसे यांनीही महिला राखीव आणि विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खडसे परिवारातील नणंद-भावजयी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. महिला राखीवमधून दोघांनी आपले अर्ज मागे घेतले नाही तर ही लढत रंगणार आहे. मात्र, रोहिणी खडसे यांनी महिला प्रवर्गातून माघार घेतली व मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातील अर्ज कायम ठेवला तर ही लढत टाळली जाईल. राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी भाजप याठिकाणी रक्षा खडसेंना रिंगणात उतरवू शकतो.

हेही वाचा - जळगाव जिल्हा बँकेत 3 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध

बुधवारी होणार छाननी -

२१ जागांसाठी २७९ अर्ज दाखल झाले असून, महाविकास आघाडीच्या एकूण ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात बोदवडची जागा देखील बिनविरोधच्या दिशेनेच आहे. भाजपकडून सर्वपक्षीयसाठी चर्चा सुरु राहण्याची शक्यता आहे. बुधवारी अर्जांची छाननी असून, ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे.

जळगाव तालुक्यात महापौर विरुध्द आमदारांची लढत रंगणार -

भाजपने स्वबळाचा नारा दिल्यामुळे आता महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. जळगाव मतदारसंघातून भाजपकडून आमदार सुरेश भोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेकडून महापौर जयश्री महाजन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार व महापौरांमध्ये जळगाव तालुक्याच्या सोसायटी मतदारसंघात लढत होण्याची शक्यता आहे.

दिग्गजांच्या संभाव्य लढती अशा -

  1. सुरेश भोळे विरुध्द जयश्री महाजन
  2. राजीव देशमुख विरुध्द उन्मेष पाटील किंवा मंगेश चव्हाण
  3. रक्षा खडसे विरुध्द रोहिणी खडसे
  4. स्मिता वाघ विरुध्द अस्मिता पाटील किंवा तिलोत्तमा पाटील
  5. संतोष चौधरी विरुध्द संजय सावकारे
  6. ए.टी.पाटील विरुध्द डॉ.सतीश पाटील
  7. सतीश शिंदे विरुध्द किशोर पाटील
  8. करण पाटील विरुध्द गुलाबराव देवकर

Last Updated : Oct 19, 2021, 2:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.