ETV Bharat / state

चिंताजनक..जळगावात एकाच दिवशी कोरोनाचे 21 बळी; 984 नवे बाधित - corona Death jalgaon

जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. आज तर एकाच दिवसात कोरोनामुळे तब्बल 21 रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे, आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या वाढून 1 हजार 848 इतकी झाली आहे.

Ambulance
रुग्णवाहिका
author img

By

Published : Apr 14, 2021, 10:25 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. आज तर एकाच दिवसात कोरोनामुळे तब्बल 21 रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे, आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या वाढून 1 हजार 848 इतकी झाली आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात बळींची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणीबाणीची परिस्थिती

जिल्ह्यात आज दिवसभरात 984 नवे बाधित समोर आले. गेल्या अनेक दिवसांनंतर नव्या बाधितांचा आकडा एक हजाराच्या आत आला असून, हा काहीसा दिलासा मानला जात आहे. समाधानाची बाब म्हणजे, आज नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील 1 हजार 195 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. परंतु, दुसरीकडे कोरोनाच्या बळींची संख्या पाहिली तर परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.

अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा आलेख चढताच

जळगाव जिल्ह्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा आलेख चढताच आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 हजार 589 अ‍‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात 8 हजार 216 रुग्णांना लक्षणे नाहीत, तर 3 हजार 373 रुग्ण हे लक्षणे असणारे आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 87.22 टक्के, तर डेथ रेट 1.78 टक्के आहे.

जळगाव शहराची स्थिती गंभीरच

जिल्ह्यात जळगाव शहर हे कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. आज देखील जळगावात सर्वाधिक 211 नवे रुग्ण आढळले. जळगाव शहरापाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यात अचानक संसर्ग वाढला आहे. मुक्ताईनगरात आज 158 रुग्ण समोर आले. सध्या जिल्ह्यात 1 हजार 554 रुग्ण ऑक्सिजन प्रणालीवर, तर 750 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - जळगावात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी; जिल्ह्यातील 133 केंद्रांवर लसीकरण सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.