जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने फैलावत आहे. आज एकाच दिवसात १८६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ हजार २६८ इतकी झाली आहे. आज दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला.
आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जळगाव शहर ४४, जळगाव ग्रामीण ६, भुसावळ ५, अमळनेर १७, चोपडा ९, पाचोरा ८, भडगाव ३, धरणगाव ८, जामनेर १९, रावेर १९, पारोळा ३, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर ५, बोदवड ११ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक (७०५) कोरोनाबाधित रूग्ण जळगाव शहरात आहेत. त्या खालोखाल ४१२ रूग्ण भुसावळ शहरात आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ९१३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सद्यस्थितीत १ हजार १३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज ४ रुग्णांचा मृत्यू -
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत २२५ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आज, एकाच दिवशी ४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जळगाव शहरातील ३ व चाळीसगाव तालुक्यातील एका ४५ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.
जळगाव जिल्हा कोरोना रुग्णसंख्या -
जळगाव शहर - ७०५
जळगाव ग्रामीण - १०९
भुसावळ - ४१२
अमळनेर- ३०२
चोपडा - २२३
पाचोरा - ८३
भडगाव - १६६
धरणगाव - १४०
यावल - १५१
एरंडोल - १३४
जामनेर - १७०
रावेर - २३८
पारोळा - २१४
चाळीसगाव - ३८
मुक्ताईनगर - ३०
बोदवड - ५३
इतर जिल्ह्यातील - १०
एकूण रुग्णसंख्या - ३ हजार २६८