जळगाव : जामनेर तालुक्यातील ( Jamner Tahsil Jalgaon ) एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ( Minor Girl Raped Jamner ) आहे. याबाबत पहूर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला ( Rape Crime Registered In Jamner ) आहे.
रस्त्यात गाडी थांबवून केला अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील गणेश शांताराम पवार याने पीडित मुलीला १८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता घरातून फूस लावून पांढऱ्या गाडीत पळवून नेले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्यावर गाडी थांबवून गाडीतच तिच्यावर अत्याचार केला. यासंदर्भात पिडीत मुलीने पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश शांताराम पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करत आहेत.
अत्याचाराच्या घटनेत होते वाढ
एका पंधरा वर्षांच्या चिमुरडीला तिच्या घरून पळवून नेत तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा जिल्हाभरात तीव्र निषेध होत असून, महिलावर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या नराधमाला तात्काळ अटक करावी व त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.