ETV Bharat / state

नदीजोड प्रकल्पासाठी 14 हजार कोटींचा निधी - जलसंपदामंत्री गिरीश महाजन

काल आम्ही कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीला होतो. त्यावेळेस दुष्काळासंदर्भात चर्चा झाली. दुष्काळ निवारण करण्यासाठी राज्य सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. यापुढील काळात राज्य सरकारला सिंचनाच्या विषयावर ठोस कामे करावी लागणार आहेत. राज्यातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

author img

By

Published : Jun 10, 2019, 4:44 PM IST

जळगाव रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन

जळगाव - राज्यातील नदीजोड प्रकल्पासाठी येत्या दोन ते तीन महिन्यात केंद्र सरकारकडून 14 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून विलंब झाला तर राज्य सरकार निधीची तरतूद करेल, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.

जळगाव रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर गिरीश महाजन हे आज पहिल्यांदा जळगावात आले. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गीतांजली एक्सप्रेसने त्यांचे रेल्वे स्थानकावर आगमन झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार काय ठोस उपाययोजना करत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर महाजन म्हणाले की, काल आम्ही कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीला होतो. त्यावेळेस दुष्काळासंदर्भात चर्चा झाली. दुष्काळ निवारण करण्यासाठी राज्य सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. यापुढील काळात राज्य सरकारला सिंचनाच्या विषयावर ठोस कामे करावी लागणार आहेत. राज्यातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने नदीजोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल.

मी संकटमोचक असून उपयोग नाही -

राज्याचा जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग सिंचनाच्या दृष्टीने चांगली कामे करत आहे. परंतु, शेवटी पाऊस हा निसर्गावर अवलंबून असतो. मी संकटमोचक असलो तरी या विषयात काहीही करू शकत नाही. राजकीय तडजोड करण्याइतके ते सोपे नाही. राजकीय विषयात तडजोड होते, विचारांचे आदानप्रदान होते. यावर्षी चांगला पाऊस होईल आणि आपण दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

Intro:जळगाव
राज्यातील नदीजोड प्रकल्पासाठी येत्या दोन ते तीन महिन्यात केंद्र सरकारकडून 14 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून विलंब झाला तर राज्य सरकार निधीची तरतूद करणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात दिली.Body:जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर गिरीश महाजन हे आज पहिल्यांदा जळगावात आले. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गीतांजली एक्सप्रेसने त्यांचे रेल्वे स्थानकावर आगमन झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार काय ठोस उपाययोजना करत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर महाजन म्हणाले की, काल आम्ही कोअर कमिटीच्या बैठकीनिमित्त मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीला होतो. त्यावेळेस दुष्काळासंदर्भात चर्चा झाली. दुष्काळ निवारण करण्यासाठी राज्य सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. यापुढील काळात राज्य सरकारला सिंचनाच्या विषयावर ठोस कामे करावी लागणार आहेत. राज्यातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी येत्या दोन ते तीन महिन्यात केंद्र सरकारच्या वतीने 14 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून निधी मिळण्यात विलंब झाला तर राज्य सरकार निधीची तरतूद करणार आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने नदीजोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल, असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.Conclusion:मी संकटमोचक असून उपयोग नाही-

राज्याचा जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग सिंचनाच्या दृष्टीने चांगली कामे करत आहे. परंतु, शेवटी पाऊस हा निसर्गावर अवलंबून असतो. मी संकटमोचक असलो तरी या विषयात काहीही करू शकत नाही. राजकीय तडजोड करण्याइतके ते सोपं नाही. राजकीय विषयात तडजोड होते, विचारांचे आदानप्रदान होते. यावर्षी चांगला पाऊस होईल आणि आपण दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू, असा विश्वास देखील महाजन यांनी व्यक्त केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.