ETV Bharat / state

जळगावात लपून छपून व्यवसाय करणारी ११ दुकाने सील; महापालिकेकडून कारवाई - महापालिकेने ११ दुकाने केली सील

जळगावात लपून छपून व्यवसाय करणारी ११ दुकाने सील करण्यात आली. ही कारवाई जळगाव महापालिकेने केली.

11 shops were sealed in, Jalgaon
जळगावात लपून छपून व्यवसाय करणारी ११ दुकाने सील; महापालिकेकडून कारवाई
author img

By

Published : May 4, 2021, 8:25 PM IST

जळगाव - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तरीही शहरातील अनेक दुकानदार जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. मंगळवारी (४ मे) देखील बळीराम पेठ भागातील अनेक दुकानदारांनी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवला होता. महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने या भागात जाऊन तब्बल ११ दुकाने सील केली. प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला.

जळगावात लपून छपून व्यवसाय करणारी ११ दुकाने सील; महापालिकेकडून कारवाई

जळगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकीकडे वाढत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी नागरिक व व्यावसायिकांकडून होताना दिसून येत नाही आहे. बाजारात दररोज गर्दी होत असून, प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार सकाळी ११नंतही अनेक व्यावसायिक आपली दुकाने लपून छपून सुरूच ठेवत आहेत. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी मुख्य बाजारपेठ परिसरात पाहणी केली असता नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

बाहेरून शटर बंद, आत व्यवसाय सुरू -

अनेक दुकानांमध्ये बाहेरून शटर लावून आत लपून छपून व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. अनेक दुकानांमध्ये ग्राहक देखील आढळून आले. मनपा उपायुक्तांनी असे प्रकार करणारी ११ दुकाने सील केली आहेत. गेल्या आठवडाभरात मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने ४०हून अधिक दुकाने सील केली असून २ लाखाहून अधिक दंड देखील वसूल केला आहे.

या दुकानांवर करण्यात आली कारवाई -

शहरातील बळीराम पेठ भागातील बजाज ट्रेडर्स, जय वैष्णवी कलेक्शन, श्री बालाजी सन्स, अरिहंत कटलरी सेंटर, मेमसाब जनरल, शिव होजिअरी, नंदुरबार सराफ, बोहरा कॉम्प्लेक्समधील ब्रँडेड जीन्स व वाहेगुरू इलेक्ट्रिकल ही दुकाने सील करण्यात आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.