हिंगोली- सर्वत्र कोरोना विषाणूमुळे नागरिक धास्तावले असताना हिंगोलीत योग विद्या धामच्या वतीने अनोखी होळी अन् कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.
आज देशभरात रंगपंचमी हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे रंगपंचमीच्या सणावर सावट पसरले आहे. आता पुण्यामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळल्याने सर्वत्र पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे आपापल्या जिल्ह्यात आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. मात्र, आज या सावटाखाली योग विद्या धाम यांच्यावतीने कोरडी रंगपंचमी खेळून कोरड्या रंगांची उधळण करण्यात आल्याचे पहावयास मिळाले.
जिल्ह्यातील बाजारपेठेवरही कोरड्या रंगाला सर्वाधिक जास्त मागणी होती. तर, ग्रामीण भागात मात्र विविध फळ आणि पळसाच्या फुलापासून रंग बनविण्यात आले होते. एकंदरीतच, कोरोनाच्या भीतीने कोरडी रंगपंचमी खेळावी लागली.
हेही वाचा - कोरोना विषाणूच्या सावटाखाली पुण्यात धुळवड साजरी