ETV Bharat / state

Woman Delivers in Auto : महिलेने रुग्णालयासमोर ऑटोरिक्षातच दिला बाळाला जन्म; रुग्णालय प्रशासन मात्र कार्यक्रमात व्यस्त - अलका मोरे

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची रुग्णालयाच्या समोरच प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर आणि कर्मचारी हे सर्व वैद्यकीय अधीक्षकांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे.

District Hospital Hingoli
जिल्हा रुग्णालय हिंगोली
author img

By

Published : Jun 5, 2023, 9:54 PM IST

Updated : Jun 5, 2023, 10:42 PM IST

हिंगोली : ग्रामीण भागतील महिलेची प्रसुती करायची असेल तर शासकीय रुग्णालयांच्या भरवशावर राहू नका, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण प्रसंगच तसा घडला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एक महिला प्रसुती करण्यासाठी वसमत ग्रामीण महिला रुग्णालयात ऑटोने आली होती. मात्र, रुग्णालयाचा स्टाफ हा कार्यालयीन वेळेत खासगी कार्यक्रमासाठी गेला होता. त्यामुळे त्या महिलेची रुग्णालयासमोरच ऑटो रिक्षात प्रसुती करण्याची वेळ आली आहे. अलका मोरे असे त्या महिलेचे नाव आहे.

काय घडले नेमके? - अलका मोरे या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या होत्या. प्रसूती करण्यासाठी नातेवाईकांनी महिलेला वसमतच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऑटोने आणले होते. परंतु, रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत रुग्णालयातील अधीक्षकांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे महिलेची प्रसुती ही रुग्णालयाच्या दारातच ऑटोमध्ये झाली.

ऑटोमध्येच दिला बाळाला जन्म : रुग्णाचे नातेवाईक संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी डॉक्टरांकडे विनंती करत होते. परंतु, निरोप समारंभाच्या कार्यक्रमात असलेले डॉक्टर आणि कर्मचारी मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे प्रसुती झालेल्या महिलेला बाळासह काही काळ ऑटोमध्येच थांबावे लागले. तर बाळाला लवकर उपचार न मिळाल्याने, बाळाची तपासणी न झाल्याने नवजात बाळाला श्वास घेण्यात त्रास होत होता.

कार्यालयीन वेळेत खासगी कार्यक्रम करणे चुकीचे आहे. यामुळे या प्रकरणामध्ये डॉक्टरांना नोटीस बजावली आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे - जिल्हा शल्यचिकित्सक मंगेश टेहरे

डॉक्टरांना तात्काळ नोटीस बजावली : रुग्णालयातील या गलथान कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घडलेल्या प्रकाराची जिल्हा आरोग्य प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. कार्यालयीन वेळेत अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करणे चुकीचे असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांना तात्काळ नोटीस बजावली असून त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक मंगेश टेहरे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. woman give birth to child in bus पंजाबमध्ये बसमध्ये गर्भवती महिलेने दिला मुलीला जन्म आरोग्य विभाग असे आले धावून
  2. Baby Birth In Running ST Bus Thane रस्त्याच्या दुरावस्थेमुळे धावत्या एसटी बसमध्ये महिलेची प्रसुती
  3. woman giving birth on the street धक्कादायक कोपरगाव तालुक्यात महिलेची प्रसुती झाली रस्त्यावर आठवड्याभरात दुसरी घटना

Last Updated : Jun 5, 2023, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.