ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी जिंकणारच - सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्याच बळावर पुन्हा उभा राहिल. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी खात्रीने जिंकणार, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. हिंगोलीतील वसमत येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Sep 10, 2019, 8:01 AM IST

हिंगोली - सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून ईडी, सीबीआय चौकशी करण्याच्या धमक्यावर धमक्या दिल्या जात आहेत. यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. वसमत येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

हिंगोलीतील वसमत येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे

कार्यकर्त्यांच्याच बळावर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभा राहिल. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी खात्रीने जिंकणार, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. 'एकदा का मुलगी सासरी गेली की, तिकडे ती सुखाने नांदतेच, या शब्दांत पक्ष सोडून जाणाऱ्यांचे सुळे यांनी कान उपटले. त्यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर सडसडून टीका केली. वयोवृद्धाला देखील तरुणासमोर झुकावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. हे सरकार अजून किती गोरगरीब लोकांना डूबवणार आहे ? असा प्रश्नही उपस्थित केला.

हेही वाचा - 'विक्रम' तू सिग्नल तोडला तरी आम्ही चालान फाडणार नाही; नागपूर पोलिसांच ट्विट व्हायरल

कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. रामराव वडकुते, राजु नवघरे, बालाजी घुगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्या दरम्यान, वसमतचे माजी आमदार व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार पक्ष श्रेष्ठीच ठरवतील असे सांगितले.

Intro:

हिंगोली- सद्याच्या परिस्थितीत भाजपकडुन ईडी, सीबीआय, गैरव्यवहारासह आदींची चौकशी करण्याच्या धमक्यावर धमक्या दिल्या जात असल्यानेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भाजपात प्रवेश करत असल्याची टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी वसमत येथे झालेल्या कार्यकर्ते मेळाव्यात केली. कार्यकर्त्यांच्याच बळावर हंमखास राष्ट्रवादी हा पक्ष पुन्हा उभा राहिल, असेही सुळे यांनी सांगितले.

Body:हिंगोली जिल्हृयातील वसमत येथे संवाद दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे ह्या आज ९ सप्टेंबर रोजी आल्या होत्या. त्यानी भाजपच्या कार्यप्रणालीवर मोठ्याप्रमाणात फैरी झाडल्या. अन वयोवृद्धाला देखील तरुणासमोर झुकावे लगत असल्याची तिखट खंत व्यक्त केली. कार्यकर्ता मेळाव्यास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. रामराव वडकुते, राजु नवघरे, बालाजी घुगे आदींसह पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी भाजपचे सुरू आलेले कामकाज सांगितले. अन या कामकाजामुळे गोर गरीब जनतेचे होत असलेले हाल सांगितले. अन अजून किती गोर गरिबाला हे सरकार डूबवणार ? असा सवाल ही केला. तर वसमतचे माजी आमदार, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील असे सांगितले. तर दांडेगावकर यांचे कार्यकर्ते असलेले कृऊबाचे माजी सभापती राजु नवघरे यांनी वसमत विधानसभा क्षेत्रातुन निवडणुक लढविण्यासाठी जोरदार तयारी चालविली आहे. त्यामुळे दांडेगावकरांनी मेळाव्यामध्ये असे सुतोवाच करत अप्रत्यक्षपणे उमेदवारीची इच्छा बोलुनही दाखविली. उपस्थित दांडेगावकर यांच्यात बोलण्यावर फार लक्ष ठेऊन होते. अन दांडेगावकर ही वरिष्ठांकडे बोलण्यातुन बोट दाखवित होते. त्यामुळे आता खरोखरच पक्ष कुणाला संधी देणार याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र पत्रकार परिषदेत कोणत्याही प्रश्नाना अतिशय मिस्कील पणे सुळे यांनी उत्तरे दिल्याने सर्व जण काही काळ गांगरूनच गेले.आता जे सोडू सोडू जात आहेत ना हे 25 वर्षांपूर्वी देखील पवार साहेबाना सोडून गेले होते. फाटा फुटीचा आमच्यावर काही ही परिणाम होतं नाही, मग काय सत्येचं राजकारण महाराष्ट्र बघणार का मग आता?सती साधू, ईडी, सीबीआय, कारखाना अशाच गोष्टी सोडून जात आहेत. ज्यांचे प्रॉब्लेम आहेत ते. तसेच आमच्या काळात नाही कोणाच्या कारखान्याला लोण दिल ना बँकेची कर्ज माफी सरसगट आणली. ज्याच तिथे पटलं नव्हतं ना ते एकेक करून घेतले मात्र 25- 25 ओव्हर राईट करून अजिबात घेतली नाहीत.Conclusion: अन आता जे फूट पडतेय ती केवळ ईडी,सीबीआय अन बँक हेच कारण असल्याचे सुळे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर आम्ही विधानसभा खात्रीनिशी जिंकणार, अन गेलेले जात राहतील मुलीचे उदाहरण देत एकदा का मुलगी सासरी गेली की तिकडे ती सुखाने नांदतेच असे हसत हसत सुळे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.