ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई ; १३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू - water issue

मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एवढी भीषण पाणीटंचाई जाणवत असेल तर अजून २ महिने कसे निघतील ? हाच मोठा प्रश्न ग्रामस्थ आणि प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

पाण्यासाठी भटकंती करताना महिला
author img

By

Published : Mar 18, 2019, 8:40 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात यावर्षीही भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज जिल्ह्यात १३ गावांमध्ये टँकर मागवला जात आहे. अजूनही बऱ्याच गावांतील ग्रामपंचयतीच्या वतीने टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल झाले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एवढी भीषण पाणीटंचाई जाणवत असेल तर अजून २ महिने कसे निघतील ? हाच मोठा प्रश्न ग्रामस्थ आणि प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

प्राप्त प्रस्तावाची पाहणी करून पथक त्या गावात जाऊन पाहणी करून टँकरच्या प्रस्तावाला मंजुरी देत आहेत. यावर्षीही जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत पूर्णतः कोरडे पडले आहेत. तापत्या उन्हातही ग्रामस्थ रानावनात विहिरींचा शोध घेत असल्याचे चित्र आहे.पाणी समस्येमुळे बऱ्याच गावातील ग्रामस्थांनी जिल्ह्यात कामानिमित्त धाव घेतली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने तलावात पाणी असताना पाणी उपसा थांबावण्यासाठी दाखवलेली निष्क्रियता आता भोवतेय.

या गावांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून - कणका, लोहगाव, माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु, जयपूर, सेनगाव, कहाकर बु, बाभूळगाव, रामेश्वर तांडा, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, येहळेगाव सोळंके या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर अजूनही १८ गावांकडून टँकरची मागणी केली जात आहे.

Intro:जिल्ह्यात यावर्षी ही भीषण पाणीटंचाईचे चटके अनेक गावातील ग्रामस्थांना सोसावे लागत आहेत. आज घडीला जिल्ह्यात १३ गावांची तहान चक्क टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. तर अजूनही बऱ्याच गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने टॅंकचे प्रस्ताव जिल्ह्यातील त्या- त्या पंचायत समितीमध्ये दाखल झालेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एवढी भीषण पाणी टंचाई जाणवत असेल तर अजून दोन महिने कसे निघतील ? हीच मोठी समस्या ग्रामस्थासह प्रशासना समोर आ वासून आहे. प्राप्त प्रस्तावाची पाहणी करून पथक त्या त्या गावात स्थळ पाहणी करून टँकरच्या प्रस्तावाला मंजुरी देत आहे.

Body:हिंगोली जिल्हा नेहमीच पाणीटंचाईने चर्चेचा असतो. तो यंदाही आहे. यावर्षीही जिल्ह्यामध्ये अत्यल्प पर्जन्यमान झालेले आहे त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तर जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत पूर्णतः कोरडे ठाक झालेत. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी एवढी तारांबळ उठली आहे. तापत्या उन्हातही ग्रामस्थ रानावनात विहिरींचा शोध घेत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थ अक्षरशः पाणी समस्यने भांबावून गेलेत. पाणी समस्येमुळे बऱ्याच गावातील ग्रामस्थांनी पर जिल्ह्यात कामानिमित्त धाव घेतली आहे. तर स्थानिक ग्रामस्थ भटकंती करून पाणी भरण्यारच हैराण आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने तलावात पाणी असताना पाणी उपसा थांबाविण्यासाठी दाखविलेली निष्क्रियता. आता भोवतेय. कधी नव्हे ते तलाव फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरडे ठण पडले आहेत. त्यामुळे त्या- त्या गावातील ग्रामस्थ पाणी शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न पणाला लावत आहेत. ज्या गावातील ग्रामपंचायतीचे हात टेकले त्या गावातील ग्रामपंचायतने टँकरचे प्रस्ताव शासन स्तरावर दाखल केले आहेत. दिवसेंदिवस ग्रामपंचायतीच्या वतीने टँकरच्या मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे केले जात आहेत.

Conclusion:या गावाची आहे टँकर च्या पाण्यावर तहान
कणका, लोहगाव, माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु, जयपूर, सेनगाव, कहाकर बु, बाभूळगाव, रामेश्वर तांडा, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, येहळेगाव सोळंके या गावात टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. तर अजूनही १८ गावांकडून टँकर ची मागणी केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.