बँकेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून दृष्टिहीन युवक बनला आई-वडिलांचा आधार - दृष्टिहीन युवकाला बँकेच्या परीक्षेत घवघवीत यश
जन्मापासूनच दोन्ही डोळ्यांनी दृष्टहीन असलेल्या युवकाने बँकेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सेनगाव येथील सुदाम वावळे असे या युवकाचे नाव आहे. घरी अठराविश्व दारिद्र्य असताना दृष्टिहीन मुलगा जन्मल्यानंतर सुदामचे आई-वडील चिंतेत पडले होते. केवळ तीन एकर कोरडवाहू शेती आणि जोड व्यवसाय म्हणून दोन शेळ्या अशा हालाकीच्या परिस्थितीत ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. हक्काची नोकरी मिळाल्याने सुदाम आपल्या आई-वडिलांचा आधार बनला आहे.
हिंगोली - जन्मापासूनच दोन्ही डोळ्यांनी दृष्टहीन असलेल्या युवकाने बँकेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सेनगाव येथील सुदाम वावळे असे या युवकाचे नाव आहे. हक्काची नोकरी मिळाल्याने सुदाम आपल्या आई-वडिलांचा आधार बनला आहे. घरी अठराविश्व दारिद्र्य असताना दृष्टिहीन मुलगा जन्मल्यानंतर सुदामचे आई-वडील चिंतेत पडले होते. केवळ तीन एकर कोरडवाहू शेती आणि जोड व्यवसाय म्हणून दोन शेळ्या अशा हालाकीच्या परिस्थितीत ते कुटुंबाचा गाडा हाकत होते.
अनेक जण सुदामच्या आई-वडिलांना टोमणेही मारत मात्र, त्याच्या आई-वडिलांनी धीर सोडला नाही. हिंगोली येथील अंध विद्यालयात सुदामने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने पुणे येथील नवरोसजी वाडिया महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. 2018 मध्ये बीए केल्यानंतर त्याने नॅशनल स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एक्झाम अकॅडमीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
हेही वाचा - समोर मृत्यू दिसल्यानंतर... हिंगोलीतील शेतकरी दाम्पत्याचा थरारक अनुभव
बँकेच्या लिपिक पदासाठी जागा निघाल्यानंतर त्यांनी अर्ज केला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यात अंध विद्यार्थ्यांसाठी केवळ आठच लिपिक पदाच्या जागा होत्या. मात्र जिद्दीने सुदामने ही परीक्षा दिली आणि या परीक्षेत 200 पैकी 118 गुण मिळवून यश संपादन केले. सुदामच्या या यशाने सर्वजण अचंबित झाले आहेत. या यशाचे श्रेय तो पुण्यातील शिक्षकांना आणि आपल्या आई-वडिलांना देतो.
Body:सुदाम वावळे असं दृष्टिहीन युवकाचे नाव आहे. तो जन्मापासूनच दृष्टिहीन आहे. घरची हलाखीची परिस्थिती कशामध्ये दृष्टिहीन मुलगा जन्मल्यानंतर आई-वडील मात्र चिंतेत पडले होते. घरी अठराविश्व दारिद्र्य. केवळ तीन एकर कोरडवाहू शेती. मात्र दरवर्षीच कोरडवाहू शेतीतून निघणारे अल्प उत्पन्न हे वावळे यांच्या कुटुंब यासाठी कठीण बनत चालले होते त्यामुळेच पती-पत्नीने शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन सुरू केले सुरुवातीला दोन शेळ्या त्यांनी विकत घेतल्या पण त्या शेळीच्या शेळ्या वाढतच गेल्या. अन सुदाम ची आई आपल्या लाडक्या अंध मुलाचा परतपाळ मनात झुरून झुरून करीत होती. तर वडील शेती करत करत शेळी पालन करीत होते, आपली शेळ्या बरोबरच राखनीच्या शेळ्या ही पळत असल्याने, कसा बसा तरी कुटुंबाचा गाडा हाकत होते. दोघे ही अशिक्षित तर मुलगा १०० टक्के दृष्टीहीन. तर अनेक जण सुदाम च्या आई-वडिलांना तुमचा मुलगा अंध आहे तो काय शिकेल तो काय साध्य करेल असेही टोमणे मारत होते. मात्र आई-वडिलांनी अजिबात धीर सोडला नाही. तर कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या मुलाला प्रोत्साहन देत राहिले. हिंगोली येथील ओमप्रकाश देवडा अंध विद्यालयातून सुदाम च्या शिक्षणाचा प्रवास सुरु झाला. सुदाम अणे याच महाविद्यालयात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले अन पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो पुणे येथे नॉरोसजी वाडिया या महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथेच पदवीचे शिक्षण पूर्ण केले 2018 मध्ये बीएचे शिक्षण घेतल्यानंतर या तरूणाने नॅशनल स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एक्झाम अकॅडमीतुन स्पर्धा परीक्षेला सुरुवात केलीय. बँकेच्या लिपिक पदासाठी जागा निघाल्या नंतर त्यांनी अर्ज केला. खरंतर महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यात केवळ अंध विद्यार्थ्यासाठी आठच लिपिक पदाच्या जागा होत्या. ही स्पर्धा परीक्षा मोठी होती मात्र तेवढ्यात जिद्दीने सुदाम ने ही परीक्षा दिली आणि या परीक्षेमध्ये त्याला 200 पैकी 118 गुण मिळाले.
शेतीवरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र अशा परिस्थितीत
Conclusion:सुदाम च्या या यशाने सर्वजण अचंबितच होऊन गेले सुदाम च्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे आई-वडील शेळ्या आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात मात्र दोन्ही डोळ्याने अंध असलेला सुदाम आज आपल्या आईवडिलांची काठी बनलाय मेहनतीच्या जोरावर आपल्या पदरात पडले याचे सर्व श्रेय तो पुणे येथील शिक्षकांना आणि आपल्या आई-वडिलांना देतोय. धडधाकट व्यक्तीलाही लाजवेल असा सुदाम अँड्रॉइड मोबाईल हाताळतो. टॉक बॅक ॲप्स चा वापर करून तो सर्वच माहिती या मोबाईलवरून गोळा करतो. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींना उपकरणे उपलब्ध करून दिली जातात त्याचा आधार दैनंदिन जीवनात होणार आहे.
व्हिज्युअल ftp केले आहेत