ETV Bharat / state

कोरोना दक्षता : गावकऱ्यांनी वेशीवरच उभारली चेक पोस्ट - coronavirus updates

कोरोनाची खबरदारी म्हणून नांदापूर रेल्वे स्थानक येथे ग्रामस्थांनी गावातील सर्व रस्ते हे काट्या टाकून बंद केले अन् एकच प्रवेशद्वार सुरू ठेवले आहे. त्या प्रवेशद्वारावर बाहेर गावावरून येणाऱ्याची नोंदणी करून घेतली जात आहे. कोण कोठून आले, कोणाच्या घरी जायचे याची सर्व शहानिशा करूनच त्या व्यक्तीला गावात प्रवेश दिला जात असल्याचे पहावयास मिळाले.

गावात बाहेरुन येणाऱ्यांची केली जाते नोंदणी

author img

By

Published : Mar 23, 2020, 4:54 PM IST

हिंगोली - कोरोनाने जगभरात थैमान घातले असून याला रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर सर्वोपतरी प्रयत्न सुरू आहेत. तर, ग्रामीण भागातही याबाबत जागरुकता निर्माण झालीय. हिंगोलीतल्या नांदापूर येथे गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक चेक पोस्ट उभारून बाहेरगावाहुन येणाऱ्यांची नोंदणीच करून घेतली जात आहे. हा आगळा वेगळा निर्णय घेणारे हे राज्यातील पहिलेच गाव आहे.

गावात बाहेरुन येणाऱ्यांची केली जाते नोंदणी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, राज्यात कोरोना बधितांची संख्या ही 89 वर तर, देशात 415 वर पोहोचली आहे. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून, बाहेर न पडणे, सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, याशिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. शहरी भागात तर ह्या सूचनांचे पालन होतच आहे. मात्र काहीतरी कामानिमित्त बाहेर गावी गेलेले कामगारांचे जथेच्या जथे हे आपल्या मूळ गावी परतत आहेत. अशा परिस्थितीत कोणाला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील नांदापूर रेल्वे स्थानक येथे ग्रामस्थांनी गावातील सर्व रस्ते हे काट्या टाकून बंद केले अन् एकच प्रवेशद्वार सुरू ठेवले आहे. त्या प्रवेशद्वारावर बाहेर गावावरून येणाऱ्याची नोंदणी करून घेतली जात आहे. कोण कोठून आले, कोणाच्या घरी जायचे याची सर्व शहानिशा करूनच त्या व्यक्तीला गावात प्रवेश दिला जात असल्याचे पहावयास मिळाले.

हेही वाचा - अट्टल चोरट्याचं पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन

या गावतील युवक ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय तलाठीदेखील या ठिकाणी तळ ठोकून आहेत. साधे पुण्याहून गाडी आल्याची माहिती मिळाली तरी त्या वाहनांना गावात अजिबात प्रवेश दिला जात नाही. यावरूनच कोरोनाचा सामना करण्यासाठी शहरापासून तर गावपातळीपर्यंत सर्वजण कंबर कसून कामाला लागल्याचे दिसून येत आहे. असे चेकपोस्ट गावा-गावात उभारले तर नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची मदत होईल.

हेही वाचा - पेटत्या तुराट्यांवर घेतली उडी; हिंगोलीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.