ETV Bharat / state

पंधराशे रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिपरी येथील ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पकडले. मालमत्ता १४० मधील जागा वाटणी पत्राद्वारे आणि तसा फेर करून देण्यासाठी मागितली होती लाच.

लाचलुचपत विभागाचे कार्यालय
author img

By

Published : Sep 21, 2019, 12:07 PM IST

Updated : Sep 21, 2019, 12:14 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे कार्यरत असलेला ग्रामसेवक पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतींबधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शिंदेनी तक्रारदारकडे भावाच्या नावाची मालमत्ता 140 मधील जागा वाटणी पत्राद्वारे करून देण्यासाठी व तसा फेर करून देण्यासाठी 1500 रुपयाची लाच मागितली होती. अमोल शिंदे असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.

लाचलुचपत विभागाचे कार्यालय

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे धाव घेतली अन तक्रार दिली. लाचलुचपत विभागाकडून 18 सप्टेंबरला तक्रारीची पडताळणी केली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवक शिंदेंना पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

अनेक दिवसांपासून ग्रामसेवक विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी संपावर होते. नुकत्याच काही मागण्याला सरकारने मंजुरी दिली असून, ग्रामसेवकानी संप मागे घेतल्यानंतर ते ग्रामपंचायत कार्यालयात रुजू झाले आहेत. रुजू होताच ग्रामसेवक अमोल शिंदेने आपल्या कार्याला बऱ्यापैकी सुरुवात केली होती. मात्र पहिल्याच प्रयत्नात फसल्याने ग्रामसेवकामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षिका अर्थना पाटील,पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी ममता अफूने,पोनी नितीन देशमुख यांच्यासह पथकाने केलीय.

Intro:
हिंगोली- सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे कार्यरत असलेला ग्रामसेवक पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतींबधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडला.

Body:अमोल शिंदे अस लाचखोर ग्रामसेवकच नाव आहे. शिंदे ने तक्रारदारकडे भावाच्या नावाची असलेली मालमत्ता 140 मधील जागा वाटणी पत्राद्वारे करून देण्यासाठी व तसा फेर करून देण्यासाठी 1500 रुपयाची लाच माघीतली होती. मात्र तक्रार दाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे धाव घेतली अन तक्रार दिली. लाचलुचपत विभागाकडून 18 सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवक शिंदे यास पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामसेवक विविध मागण्या पुर्ण करण्याच्या मागणीसाठी संपावर होते. नुकत्याच काही मगण्याला सरकारने मंजुरी दिली असून, ग्रामसेवकानी संप माघे घेत ग्रामपंचायत कार्यालयात रुजू झाले आहेत. रुजू होताच ग्रामसेवक अमोल शिंदेने आपल्या कार्याला बऱ्यापैकी सुरुवात केली होती.मात्र पहिल्याच प्रयत्नात फसल्याने ग्रामसेवकामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Conclusion:ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षिका अर्थना पाटील,पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी ममता अफूने,पोनी नितीन देशमुख यांच्यासह पथकाने केलीय.

लाचलुचपत विभागाचे व्हिज्युअल मोजो वरून अपलोड केले आहे बातमी मध्ये वापरावे
Last Updated : Sep 21, 2019, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.