ETV Bharat / state

पोलिसांवरच दगडफेक करत चोरांनी लंपास केले २ लाखांचे दागिने - akhada balapur police

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आखाडा बाळापूर येथे चोरांनी दागिन्याचे दुकान फोडले. मात्र, त्याचवेळी गस्त घालत असलेले पोलीस तिथे आले परंतु, त्यांच्यावर दगड फेक करुन २ लाखांचे दागिने घेऊन धूम ठोकली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोलीत पोलिंसावरच दगड फेक करुन चोर दागिने घेऊन लंपास
author img

By

Published : Aug 3, 2019, 10:27 PM IST

हिंगोली - गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आखाडा बाळापूर येथे चोरांनी दागिन्याचे दुकान फोडले. मात्र, त्याचवेळी गस्त घालत असलेले पोलीस तिथे आले. परंतु, त्यांच्यावर दगडफेक करुन चोरांनी २ लाखांचे दागिने घेऊन धूम ठोकली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आखाडा बाळापूर येथील मराठवाडा चौकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यानी बोंढारे ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. आणि दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारला. दागिने पळून नेताना सुरक्षा रक्षकास मारहाण केली. एवढ्या मध्यरात्री सुरक्षा रक्षकास होत असलेली मारहाण पाहून गस्तीवर असलेले पोलीस शिपाई गणेश राहिरे, जमादार अंकुश शेळके यांनी त्यांच्याकडे जीप वळवली. जीपमधून कर्मचारी उतरून चोरट्यांना पकडण्यासाठी धाव घेतात तोच चोरट्यांनी त्यांच्यावर दगड फेकायला सुरुवात केली. तरीही पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले मात्र अंधाराचा फायदा घेत चोर पळून गेले. याची चर्चा जिल्ह्यात जोरदार रंगत आहे.

तसेच दागिन्याच्या दुकानाजवळच असलेल्या एका फोटो स्टुडिओ मध्ये चोरी करून एक कॅमेरा, १२ हजार रूपये आणि एक हार्ड डीस्क चोरी केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी बाळापूर पोलीस तपास करत असून, चोरट्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे लवकरच पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचू शकणार असल्याचे पोलीस निरीक्षक राहिरे यांनी सांगितले.

Intro:हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आखाडा बाळापूर येथे मराठवाडा चोक येथे सराफा दुकान फोडुन दोन लाखांचे दागिने चोरले, अन चोरटे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गसतीवर असलेले पोलीस कर्मचारी दुकानाजवळ पोहोचले तोच चोरट्यांनी त्यांच्यावर दगड फेक केली अन अंधाराचा फायदा घेत पलायन केले. हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. दागिने लंपास झाल्याप्रकणी संदीप बोंढारे यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्राइ दाखल केला आहे.

Body:आखाडा बाळापूर येथील मराठवाडा चौकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यानी बोंढारे ज्वेलर्सचे शेटर वाकवून दुकानात प्रवेश केला अन दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारला. पळून जातांना सुरक्षा रक्षकास मारहाण करीत होते. एवढ्या मध्यरात्री सुरक्षा रक्षकास होत असलेली मारहाण पाहून गस्तीवर असलेले पोनि गणेश राहिरे, जमादार अंकुश शेळके आदीनी त्यांच्याकडे जीप वळविली. जीप मधून कर्मचारी उतरून चोरट्यांना पकडण्यासाठी धाव घेतात तीच चोरट्यांनी त्यांच्या वर दगड फेक करण्यास सुरुवात केली. तरी ही पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले मात्र अंधाराचा फायदा घेत चोरट्याने पलायन केले. याची चर्चा जिल्ह्यात जोरदार रंगत आहे. मग पोलीस काय गस्त साठी रिकामी गाडीच फिरवीत आहेत की काय? असा सवाल ग्रामस्थांतून होत आहे.

Conclusion:तसेच सराफा दुकाना जवळच असलेल्या एका फोटो स्टुडिओ मध्ये चोरी करून एक कॅमेरा, 12 हजार रोख आणि एक हार्डीक्स लंपास केलीय. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. बाळापूर पोलीस तपास करीत असून, चोरट्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे लवकरच पोलीस चोरट्यांपर्यन्त पोहोचू शकणार असल्याचे पोनि राहिरे यांनी सांगितले.

फुटेज चे फोटो ftp केलेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.