ETV Bharat / state

Accident : ट्रक दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू - Two died on the spot

हिंगोलीहून नांदेड मार्गे जाणाऱ्या ट्रक, दुचाकींची समोरासमोर धडक ( Truck bike accident ) झाल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू ( Two killed in truck two wheeler accident ) झाला आहे. ही घटना कृषिउत्पन्न बाजार समिती ( Agriculture Produce Market Committee Hingoli ) जवळ सांयकाळी 7.30 च्या दरम्यान घडली.

Accident
Accident
author img

By

Published : Dec 14, 2022, 10:52 PM IST

हिंगोली - जिल्ह्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. हिंगोली नांदेड रस्त्यावर ट्रक दुचाकीच्या धडकेत ( Truck bike accident ) दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू ( Two killed in truck two wheeler accident ) झाल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता कृषिउत्पन्न बाजार समिती ( Agriculture Produce Market Committee Hingoli ) जवळ हा अपघात झाला आहे. सतीश संभाजी मोगले (25 ) अमोल प्रकाश मोगले (23) दोघे ही राहणार मसोड ता.कळमनुरी जि. हिंगोली अशी दोघांची नावे आहेत.

ट्रक चालकाचाविरुद्ध गुन्हा - मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे दुचाकीवरून मसोडकडे जात होते, दरम्यान, हिंगोलीहुन नांदेड मार्गे जाणाऱ्या ट्रक दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. याच मार्गावर वारंगा फाटा येथे 13 डिसेंबर रोजी पहाटे कारने मॉर्निंगवाक करणाऱ्यास चिरडले होते. ही घटना ताजी असतानाच हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून, प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.