हिंगोली - वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे 2 जणांचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पेंटर (रंगकाम काम करणारा) शिडीच्या साहाय्याने दुकानावर नावे टाकत होता. त्यावेळी शिडीवरून त्यांचा तोल गेला. एवढ्यात त्याला वाचवण्यासाठी मालकाने धाव घेतली. मात्र, शिडीचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने यात दोघांचाही मृत्यू झाला.
हेही वाचा - हिंगोलीत अज्ञात वाहनाची धडक, बौद्ध भदंतांचा जागीच मृत्यू
महेश कनेवाल आणि शेख आयुब (पेंटर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. कुरुंदा येथील महेश कनेवाल यांच्या आडत दुकानाचा गुरुवारी शुभारंभ होणार होता. त्या अनुषंगाने शुभारंभांची तयारी गतीने सुरू होती. यावेळी शेख आयुब पेंटर हे दुकानावर नाव टाकत होते. त्यांनी वर चढण्यासाठी दुकानाला शिडी लावली होती. या शिडीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.