ETV Bharat / state

अंगणवाडी सेविकांनी खाल्ला चिमुकल्यांचा खाऊ; दोघींचे निलंबन तर, दोघींच्या वेतनात कपात - pushpalata band

सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील अंगणवाडी सेविकांनी या पोषण आहारात हेराफेरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलांची पटसंख्या वाढवून सांगणे, कमी आणि अनियनित घरपोच आहार वाटप करणे अशा तक्रारींची दखल घेऊन अंगणवाडी सेविका पुष्पलता बंड यांना सेवेतून कायमस्वरुपी कमी करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविकांनी खाल्ला चिमुकल्यांचा खाऊ
author img

By

Published : Sep 4, 2019, 12:49 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील अंगणवाडी सेविकांनी या पोषण आहारात हेराफेरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलांची पटसंख्या वाढवून सांगणे, कमी आणि अनियमित घरपोच आहार वाटप करणे, अशा तक्रारींची दखल घेऊन अंगणवाडी सेविका पुष्पलता बंड आणि ज्योती उचितकर यांना सेवेतून कायमस्वरुपी कमी करण्यात आले आहे.

महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांच्याकडे दोन ऐवजी एकाच महिन्याचा घरपोच आहार वाटप केल्याची तक्रार आली होती. या तक्रारीची दखल घेत सदर कारवाई करण्यात आली. याव्यतिरीक्त, मदतनिस अनुसया वानरे आणि प्रतिभा धावळे यांचे एका महिन्याचे मानधन कपात करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे अंगणवाडी सेविकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आणखी काही अंगणवाडी सेविकांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई आहे. अजून काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Intro:

*दोघींना दाखविला घरचा रस्ता* *तर दोन मदतनीसांचे केले वेतन कपात*

हिंगोली- शासन जरी चिमूल्यांसाठी आहार पुरवीत असले तरीही बहुतांश अंगणवाडी ताई त्या चिमूल्यांच्या तोंडी आहार जाऊ देत नाहीत. हे आज हिंगोली जिल्ह्यात चोकशी मध्ये उघड झाल्याने महिला व बालविकास अधिकाऱ्यांने त्या दोन अंगणवाडी ताईना कायमचा घरचा रस्ता दाखविलाय, तर दोन मदतनीसांचे एका महिन्याचे वेतन कपात केले. ही घटना घडलीय जिल्ह्यातील वरुड चक्रपाण येथे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Body:जिल्ह्यात पोषण आहारात अफरातफर होण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढत आहेत. ह्या अंगणवाडी ताई शासनाचा माल म्हणजे आपल्या घरचा माल असल्यासारख्याच वागत आहेत. हा सर्व गंभीर प्रकार उघड झालाय तो वरुड चक्रपण येथील अंगणवाडीत चिमुकल्यासाठी येणाऱ्या पोषण आहारात हेरा-फेरी करुन स्वत:चे घर भरल्याने चौकशी अंती दोषी आढळलेल्या सदोन अंगणवाडी सेविकांना सेवेतून कायमस्वरुपी कमी केलेे तर दोन मदतनीसांचे एका महिन्याचे मानधन कपात केले आहे. असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास गणेश वाघ यांनी पत्राद्वारे काढले आहेत.

राज्य शासनाकडून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचा पोषण आहार पुरविला जातो. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बहुतांश अंगणवाड्यामध्ये हा पोषण आहार चिमूल्यांच्या तोंडी जात नाही. बऱ्याच अंगणवाडी ताई तर चिमुकल्याच्या नावांची संख्या फुगवून देत असल्याने तेव्हढा पोषण आहार शासनाकडून मागवून घेतला जातो. मात्र काहीना वेगवेगळी कारणे समोर करून पोषण वाटप केला जात नाही तर कधी कमी आहार दिला जातोय. मात्र सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील अंगणवाडी सेविकांनी या पोषण आहारात मापात पाप करुन स्वत:चे पोट भरल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. त्यामुळेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास गणेश वाघ यांच्याकडे दोन महिन्यापैकी एकाच महिन्याचा घरपोच आहार वाटप केल्याची तक्रार प्राप्त होताच तक्रारीची दखल घेत. चोकशीत अंगणवाडी सेविका पुष्पलता बंड व ज्योती उचितकर ह्या दोघी दोषी आढळल्या. त्यामुळे त्याना कायम स्वरुपी सेवेतून कमी केले आहे.
Conclusion:तर मदतनिस अनुसया वानरे व प्रतिभा धावळे यांचे एका महिन्याचे मानधन कपात केले आहे. या कारवाईमुळे अंगणवाडी सेविकामध्ये मात्र चांगलीच खळबळ उडालीय. आहार घरी पळविण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याने, अजूनही अंगवाडी ताईंची चोकशी करण्याची मागणी होतेय. जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई असल्याने, ताईना तर चपराक बसलीय. आता अजुन प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.