ETV Bharat / state

हिंगोलीत एकाच दिवशी कोरोनाचे 28 पॉझिटिव्ह रुग्ण, 'हे' परिसर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित

जिल्ह्यात आज 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी रुग्णसंख्या एकाच दिवशी आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुक्तांनी हिंगोली येथे दिलेल्या भेटीत कोरोनाची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवली होती, त्यांचे भाकीत खरे ठरले आहे. आजघडीला जिल्ह्याचा आकडा 361 वर पोहोचला आहे.

हिंगोलीत 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
हिंगोलीत 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
author img

By

Published : Jul 14, 2020, 7:17 PM IST

हिंगोली : जिल्ह्यात एकाच दिवशी 28 रेकॉर्ड ब्रेक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या-ज्या गावात व भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले तो भाग आता प्रशासनाच्यावतीने सील करण्यास सुरुवात केली आहे. तर, हिंगोली शहरातील हरण चौक हा भाग आता कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या भागातील लहान हालचालीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

हिंगोली शहरातील हरण चौक, पेन्शनपुरा, गोदावरी हॉटेल ते अशोक नाईक यांच्या घरापर्यंतच्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सदर भाग हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या भागातील लहानसहान बाबींवर जिल्हा व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांच्या हालचालींवर पूर्णपणे बंधणे घालण्यात आली आहेत. तर, या भागात आवश्यक त्या सेवा नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढलेल्या आदेशात नमूद केल्या आहे.

हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासनच आता सतर्क झाले असून, आरोग्य विभागही आता कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या भागात वयोवृद्ध व गरोदर मातांची तपासणी करण्यासाठी सक्रीय झाला आहे. दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चाललेली आहे. मात्र, आज (मंगळवार) 28 कोरोनाबाधित आढळल्यामुळे जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी रुग्णसंख्या एकाच दिवशी आढळली आहे. आयुक्तांनी हिंगोली येथे दिलेल्या भेटीत कोरोनाची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवली होती, त्यांचे भाकीत खरे ठरले आहे. आजघडीला जिल्ह्याचा आकडा 361 वर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.