ETV Bharat / state

हिंगोलीत ट्रकच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू - truck hits bike

इंदिरा गांधी चौकात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. अमोल काशिनाथ दिनकर (वय ३२) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

इंदिरा गांधी चौकात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Jan 7, 2020, 12:32 PM IST

हिंगोली - शहरातील इंदिरा गांधी चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दिवसभरातील याच रस्त्यावरची ही दुसरी घटना आहे. अमोल काशिनाथ दिनकर (३२) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

इंदिरा गांधी चौकात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू

दिनकर हे सेनगाववरून दुचाकीने (एमएच ३८ आर ०४२४) हिंगोलीकडे येत होते. दरम्यान, इंदिरा गांधी चौक येथे दुचाकीला ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये दिनकर यांना गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडल्याने शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. तर, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक उशिरापर्यंत सुरळीत केली. धडक देणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अजून तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल; अखेर 'त्या' चिमुकल्यांची थंडीपासून सुटका

या घटनेतून शहरांमध्ये अवजड वाहतुकीला प्रवेश बंद केला असला तरीही मोठ्या प्रमाणात शहरातून अवजड वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यामुळे, दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत वाढच होत चालली आहे. या रस्त्यावर असलेल्या शासकीय विश्रामगृहासमोर देखील एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. त्याची दुचाकी पूर्णपणे ट्रक खाली गेली मात्र, तो रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्यामुळे थोडक्यात बचावला. यात दुचाकीचे नुकसान झाले.

हेही वाचा - हिंगोलीत जि.प. शाळेला आग; संगणक संचासह इतर शैक्षणिक साहित्य जळून खाक

Intro:

हिंगोली- शहरातील इंदिरा गांधी चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडलीय. दिवसभरातील याच रस्त्यावरील ही दुसरी घटना आहे. शहरातून अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.

Body:अमोल काशिनाथ दिनकर (३२) अस मयत शिक्षकांचे नाव आहे. दिनकर हे सेनगाव वरून एम एच 38 आर 0424 या क्रमांकाच्या दुचाकीने हिंगोलीकडे येत होते. दरम्यान इंद्रा गांधी चौक येथे दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये दिनकर रस्त्यावर जोरात कोसळते मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडल्याने तात्काळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविलाय. तर विस्कळीत झालेली वाहतूक शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी उशिरापर्यंत सुरळीत केली. अन धडक देणाऱ्या ट्रक ला पोलिसानी ताब्यात घेतलंय. शहरांमध्ये अवजड वाहतूक किल्ला प्रवेश बंद केला असला तरीही मोठ्या प्रमाणात शहरातून अवजड वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अजून तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. Conclusion:तसेच या रस्त्यावर शासकीय विश्राम गृहा समोर ही एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. त्याची दुचाकी पूर्ण पणे ट्रक खाली गेली होती. तर तो रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. यात दुचाकींचा नुकसान झाले. तर सुदैवाने दुचाकीस्वाराचा जीव वाचला. दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत वाढच होत चालली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.