हिंगोली - काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडेंनी उमेदवारी अर्जातील अनेक रकाने रिकामे ठेवले. तरीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला. त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई करून, वानखेडेंची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी हिंगोली लोकसभेच्या अपक्ष उमेदवार त्रिशला कांबळेंनी केली आहे.
कांबळेंनी या संदर्भात उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. तसेच त्यांनी न्यायालयाला याबाबतचा निर्णय निवडणुकीच्या पूर्वी देण्याची विनंती केली आहे. एका बाजूला कांबळेंनी हे आरोप केले असले तरी, त्यांना याची काहीही माहिती नाही. त्यांचे पती जे लिहून देतील तेवढेच त्या माध्यमांना वाचवून दाखवत आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा गौप्यस्फोट केल्याने हिंगोली लोकसभा मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे याला कसे तोंड देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.