ETV Bharat / state

Tractor Morcha in Hingoli : हिंगोली जिल्ह्याचे पाणी नांदेडला पळवण्याचा प्रयत्न, संघर्ष समितीचा आरोप - Hingoli Kayadhu River

कळमनुरी तहसीलवर संघर्ष समितीच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात ( Tractor Agiation Kalamnuri Tahasil Office ) आला. यावेळी कयाधू नदीवर बंधारे बांधण्यासह सापळी धरण रद्द ( Cancel Sapali Dam Proposal Kayadhi River ) करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्व पक्षीय नेते व शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.

Tractor Agiation in Hingoli
Tractor Agiation in Hingoli
author img

By

Published : Jan 2, 2022, 6:29 PM IST

हिंगोली - कयाधू नदीवर बंधारे बांधण्यासह सापळी धरण रद्द करण्याच्या ( Cancel Sapali Dam Proposal Kayadhi River ) मागणीसाठी कळमनुरी तहसील कार्यालयावर संघर्ष समितीच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा ( Tractor Agiation Kalamnuri Tahasil Office ) काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्व पक्षीय नेते व शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी, हिंगोली जिल्ह्याचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार शिवाजी माने यांनी दिला.

अन्यथा कयाधू नदी कोरडी पडून...

हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर ( Hingoli Kayadhu River ) बंधारे बांधण्यात न आल्याने प्रतिवर्षी कोट्यवधी लिटर पाणी वाहून जाते. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तब्बल 140 बंधाऱ्याच्या मागणीला अद्यापही मंजूरी मिळाली नाही. त्याउलट कयाधू नदीचे पाणी वळवून थेट नांदेडला नेण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. यामुळे कयाधू नदी कोरडी पडून हिंगोली जिल्ह्यात वाळवंट होण्याची शक्यता संघर्ष समितीने वर्तविली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कळंबोली येथील तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढून प्रशासनाकचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न संघर्ष समितीकडून करण्यात आला.

कळमनुरी तहसीलवर संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेला ट्रॅक्टर मोर्चा

या आहेत मुख्य मागण्या

कळमनुरी तालुक्यातील नियोजित सापळी धरण रद्द करावे. तसेच, हिंगोली जिल्ह्यातून वाहत असलेल्या कयाधू नदीवर बंधारे बांधावेत, अशी मागणी यावेळी निवेदना व्दारे प्रशासनाकडे करण्यात आली. मोर्चात सिंचन समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार ऍड शिवाजी माने, आमदार संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे, हिंगोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कावळे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर यांसह शेतकरी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.