ETV Bharat / state

हिंगोलीत वाघाने ३ गाई केल्या फस्त, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - हिंगोलीत वाघाची दहशत़

खंडाळा येथे ३ गाईंवर, तर कलगाव येथे एका गाईवर वाघाने हल्ला केला. खंडाळा येथील राम किसन गायकवाड आणि शिवाजी गायकवाड या शेतकऱ्यांना वाघाचे समोरासमोर दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत पळ काढला.

हिंगोलीत वाघाने ३ गाई केल्या फस्त
author img

By

Published : Oct 31, 2019, 7:41 PM IST

हिंगोली - खंडाळा परिसरात वाघाने 4 गाईवर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. वनविभागाने वाघाचे लोकेशन तपासले असता खंडाळा परिसरात वाघ असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

हिंगोलीत वाघाने ३ गाई केल्या फस्त

खंडाळा येथे ३ गाईंवर, तर कलगाव येथे एका गाईवर वाघाने हल्ला केला. खंडाळा येथील राम किसन गायकवाड आणि शिवाजी गायकवाड या शेतकऱ्यांना वाघाचे समोरासमोर दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत पळ काढला. दरम्यान, तुरीच्या ओळीत बसलेला वाघ तेथून उठला आणि समोर जाऊन एका गाईवर हल्ला केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाला वाघ आल्याची माहिती कळताच विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी त्यांच्या पथकासह स्वतः खंडाळा आणि कलगाव शिवारात धाव घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. तसेच गाईंची योग्य ती नुकसान भरपाई देणार असल्याचे केशव वाबळे यांनी सांगितले.

हा वाघ यवतमाळच्या वनपरिक्षेत्रातील असून त्याची वन विभागाकडे नोंद सुद्धा आहे. एवढेच नव्हे तर वाघाच्या गळ्यामध्ये असलेल्या रेडिओ कॉलरनुसार त्याचे लोकेशन हे दिवसातून दोन वेळा ट्रेस केले जाते. त्यानुसार संबंधित वन विभागाला त्याची माहिती कळविली जात आहे.

वनविभागाने वाघाने फस्त केलेल्या गाईजवळ ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. त्या परिसरावर वनविभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या सोयाबीनचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यातच आज पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकरी कामाला लागले आहेत. मात्र, वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.

Intro:हिंगोली तालुक्यातील खंडाळा परिसरात वाघाचे दर्शन झाले असून वाघाने चार गाईवर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली वनविभागाने वाघाचे लोकेशन चेक केले असून कलगाव खंडाळा परिसरात वाघ असल्याचे निष्पन्न झाले आहे पन्नास वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच हिंगोली मध्ये वाघ असल्याचे समोर आले आहे खंडाळा येथील शेतकऱ्यांनी समोरासमोर वाघ पाहिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर या भागात वाघांच्या डरकाळ्या सुरूच असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वाघ आल्याची माहिती वन विभागाला कळताच विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी त्यांच्या पथकासह स्वतः खंडाळा आणि कलगाव शिवारात धाव घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे.

Body:हिंगोली तालुक्यातील मुंबई परिसरात वाघाचे पहिले लोकेशन आढळून आले आहे. काही कालावधी नंतर वाघ कलगाव आणि खंडाळा शिवारात असल्याचे लोकेशन मधून स्पष्ट झाले आहे खंडाळा येथे तीन गायीवर तर कलगाव येथे एका गाईवर वाघाने हल्ला केलाय. खंडाळा येथील राम किसन गायकवाड आणि शिवाजी गायकवाड शेतकऱ्यांना वाघाचे समोरासमोर दर्शन झाले त्यांनी आरडाओरड करत पळ काढला. दरम्यान तुरीच्या ओळीत बसलेला वाघ तेथून उठला आणि समोर जाऊन एका गाईवर त्याने हल्ला हे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितले त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये एवढी भीती निर्माण झाले की शेतामध्ये कोणता शेतकरीच हरकत नाहीये. तसेच वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या भागात धाव घेऊन नागरिकांना व शेतकऱ्यांना या भागात करण्याच्या सूचना देखील दिलेल्या असल्याचे विभागीय वनाधिकारी केशव वागळे यांनी ईटीवी भारतशी बोलताना सांगितले. तसेच वाघांचे वृक्ष झालेल्या गाईंच्या मालकांना देवा नुसार योग्य ती नुकसान भरपाई लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर अदा केली जाणार असल्याचे वाबळे यांनी सांगितले .

Conclusion:हा वाघ यवतमाळच्या वनपरिक्षेत्रातील असून त्याचे वन विभागाकडे नोंद सुद्धा आहे. एवढेच नव्हे तर वाघाच्या गळ्यामध्ये असलेल्या रेडिओ कॉलर नुसार त्याचे लोकेशन हे डेहराडून दिवसातून दोन वेळा ड्रेस केले जाते त्यानुसार संबंधित वन विभागाला त्याची माहिती कळविली जातेय. विभागाने वाघाने फस्त केलेल्या गाई जवळ ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. त्या परिसरावर वन विभाग पत्ती बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या सोयाबीनचे सीजन जोरात असल्याने या वाघामुळे मात्र शेतकऱ्यांचा चांगला हिरमोड झाला आहे आजच कुठे पावसाने उघडीप दिली आणि झाकून ठेवले सोयाबीन शेतकरी बाहेर काढत होते मात्र वाघ आल्याची माहिती करतात शेतकऱ्यांनी शेतीची कामे पूर्णता बंद पाडली आहेत. एकंदरीतच सुरुवाती सुरुवातीला वाघ आल्याची अफवा होती. मात्र तो वाघच असल्याचे वनविभागाच्या लोकेशनवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोकळ अफवाना आता पूर्णविराम बसला आहे. फस्त केलेल्या गाईंचे फोटो ftp केले आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.