हिंगोली : नांदेड जिल्ह्यातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने बॅंक ऑफ इंडियाची बॅंक फोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात त्या अलपवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा मुलगा हिंगोली तालुक्यातील टाकळी ( Takli in Hingoli taluka ) येथील आहे. त्याला मोबाईलवर गाणे ऐकण्याची सवय जडली होती. त्यासाठी मोबाईल हवा होता म्हणून तोे पैशांची जुळवा जुळव करत होता. म्हणून त्याने बॅंक फोडण्याचा प्रयत्न केला.
त्याला शाळेत शिष्यवृत्ती मिळत होती. मात्र त्या साठी बँकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या गंगानगरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ( Bank of India branch in Ganganagar ) खाते उघडण्यासाठी तो आई सोबत गेला होता. दरम्यान, आई चौकशी करत होती. त्यावेळी त्याने पुर्ण बँक फिरून पाहिली, तो जेव्हा कॅशीअर जवळ गेला त्याला मोठ्या प्रमाणात पैशाचे बंडल दिसले. ते पाहून त्याने दरोड्याचे प्लॅन आखला.
पैसे पाहून फिरले युवकाचे डोळे
गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल घेण्यासाठी तो बैचेन होता. त्यामुळे पैशाचे नियोजन करत होता. मात्र, बँकेत गेल्यानंतर त्याला पैशाचे बंडल दिसले. त्यानुसार त्याने बँक फोडण्याचा प्रयत्न केला. तो बँक फोडण्याचे सर्व साहित्य घेऊन रात्री घटनास्थळी दाखल झाला. बँकेच्या भिंतीला लोखंडी रॉडने छिद्र पाडण्यास सुरुवात केली. त्यावेळी काहीतरी फोडण्याचा आवाज येत असल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांना आला. त्यांनी पाहणी केली असता, हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. नागरिकांनी ही बाब रात्रीच्या गस्तीवर असलेले जमादार सुधीर तपासे यांना कळवली. आणि घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्याने साहित्य जागेवरच सोडून पलायन केले.
रस्त्यावरील मजुराने पकडले
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोरट्याचा शोध सुरू केला. तेव्हाच सावरखेडा येथे रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांनी त्याला पकडून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चौकशी केली असता, मला गाणे ऐकण्यासाठी मोबाईल पाहिजे होता, म्हणून मी हा प्रकार केल्याचे त्या मुलाने सांगितले.
Bank robbery in Hingoli : मोबाईलवर गाणे ऐकण्याची हौस पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन मुलाने केला बँक फोडण्याचा प्रयत्न - Attempted bank robbery
मोबाईलवर गाणी ऐकण्याचा छंद (Hobby of listening songs on mobile) जोपासण्यासाठी अल्पवयीन मुलाने अजब कारनामा केला. मोबाईल घेण्यासाठी बॅंकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न (Attempted bank robbery) केला. मात्र, त्याचा हा डाव नागरिकांच्या सतर्कतेने फसला. ही घटना घडलीय, हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या गंगानगरातील बँक ऑफ इंडिया बँकेत (Ganganagar Bank of India branch ) येथे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा ( Filed fir against minor ) दाखल केला आहे.