हिंगोली - शनिवारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये राज्यातून अकराव्या क्रमांकावर हिंगोली जिल्ह्यातील साटंबा या लहानशा गावातील शेतकऱ्यांचा मुलगा ज्ञानेश्वर प्रल्हाद घ्यार हा आला. त्याने उपजिल्हाधिकारी पद पटकावले. ज्ञानेश्वरने घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे. याबाबत ईटीव्ही भारतने ज्ञानेश्वरच्या आई वडिलांशी बातचीत केली....
आम्ही काय तेवढे शिकलेलो नाहीत. दिवस रात्र शेतात काबाड कष्ट करायचे तर कधी रोजनदारी करून, शिकत असलेल्या मुलांना पैसे कसे पाठवता येतील हाच आम्ही पती-पत्नी सारखा विचार करायचो असे ज्ञानेश्वरच्या वडिलांनी सांगितले. आज ना उद्या दोन्ही मुलांना लहान-सहान कोणतीही नोकरी लागावा हीच आमची अपेक्षा होती. मात्र, एवढी मोठी नोकरी आमच्या न्यानूला लागेल अस कधीच वाटलं नव्हतं. पण त्यांनी तर आमची सारी स्वप्नच पूर्ण करून टाकल्याचे वडिलांनी सांगितले. त्यामुळे आम्हीच काय गावातील सर्वच जण भाराऊन गेलो असल्याचे उपजिल्हाधिकारी झालेल्या ज्ञानेश्वरच्या आईने सांगितले.
शनिवारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल हाती लागला. यामध्ये संपुर्ण राज्यातून अकराव्या क्रमांकावर हिंगोली जिल्ह्यातील साटंबा या लहानशा गावातील शेतकऱ्यांचा मुलगा ज्ञानेश्वर प्रल्हाद घ्यार याने उपजिल्हाधिकारी पद पटकाविले. ज्ञानेश्वर यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. ज्ञानेश्वर चे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण गावापासून काही अंतरावर असलेल्या भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्यालयात झाले. शाळेची सुट्टी झाल्यानंतर शेतामध्ये काम करून तो आपल्या आई-वडिलांना मदत करत असत. लहानपणापासूनच ज्ञानेश्वर हा अभ्यासामध्ये हुशार होता. तर इकडे ज्ञानेश्वरचे आई-वडील कधी शेतात तर कधी शंभर रुपयाप्रमाणे रोज मजुरी करून दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च भागवत असत. त्यानंतर दोघांनीही डीएडचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, या लहान भावात शिक्षणामध्ये रस असल्याचे पाहून मोठ्या भावाने शिक्षण सोडून दिले. आई-वडीलांच्या साथीने ज्ञानेश्वरला मदत करण्याचा निर्णय घेतला. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे ज्ञानेश्वरला सर्वप्रथम नोकरी ही महत्त्वाची होती. त्यामुळे पुढचे शिक्षण सुरू असतानाच ज्ञानेश्वरने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली होती.
पोलीस भरती किंवा कोणतीही नोकरी लागावी हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वरने अहोरात्र अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्याचा उपयोगच हा झाला की डिएड पूर्ण होण्याअगोदर ज्ञानेश्वरला पोस्टल असिस्टंट केंद्र सरकारचा जॉब मिळाला होता. ती नोकरी करीत असताना मुक्त विद्यापीठात बी. ए. पूर्ण केले, अन अभ्यासात नियमितता ठेवली. नोकरी लागल्यामुळे घरच्यावर तेवढे अवलंबून राहण्याची वेळ आली नाही. अभ्यासाचे नियोजन करून, कायम सातत्य ठेवले, ध्येय डोळ्या समोर ठेवत अन आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून नोकरी अन अभ्यास सुरू ठेवला. पत्नीने देखील सहकार्य केल्याचे ज्ञानेश्वरने सांगितले. याचे सर्व श्रेय जाते ते माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना. त्यांनी जर मला सहकार्य केले नसते तर कदाचित मला आहे त्या नोकरीवर समाधान मानावे लागले असते. मात्र, माझी सुरुवातीपासून आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती ती आज पूर्ण झाली आहे.
अभ्यासात सातत्य ठेवा यश हमखास मिळणार
अभ्यास करत असताना ध्येय डोळ्यासमोर ठेवून नेहमीच अभ्यास करावा. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला एखादी नोकरी लागली तर त्या नोकरीचा आधार घेत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण अगोदरच कोणताही एमपीएससीचा विद्यार्थी अभ्यास करत असताना खूप मोठ्या अडचणीला सामोरे जातो. मलाही अनेक अडचणी आल्या मात्र मी त्यावर मात करत गेलो. अशाच प्रकारे प्रत्येकाने मात करायला हवी. अभ्यासामध्ये जर सातत्य ठेवले तर निश्चितच आपल्याला यश मिळते असं ज्ञानेश्वर घ्यार