ETV Bharat / state

'त्या' बाळाला महिला पोलीस कर्मचाऱ्याने केले स्तनपान

हिंगोली शहरातील बस स्थानकातील चौकशी कक्षाजवळ शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास एक पाच ते सहा महिन्याचा चिमुकला कपड्यात गुंडाळून ठेवत निर्दयी आईने पलायन केले.

hingoli
hingoli
author img

By

Published : Jan 17, 2021, 3:50 PM IST

हिंगोली - शहरातील बस्थानकात आढळलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. बाळ सुखरूप असले तरी आईचे दूध न मिळाल्याने बाळ रडत होते, हे पाहून कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचारी शेख सलमा यांचे ममत्व जागे झाले, अन् त्यांनी लागलीच बाळाला जवळ घेऊन स्तनपान केले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तर त्या निर्दयी मातेचा पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध घेतला जात आहे. हिंगोली शहरातील बस स्थानकातील चौकशी कक्षाजवळ शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास एक पाच ते सहा महिन्याचा चिमुकला कपड्यात गुंडाळून ठेवत निर्दयी आईने पलायन केले.

सदरील धक्कादायक बाब ही पहाटे

पहाटे बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. अन् आवाजाच्या दिशेने धाव घेतली, तर बाळ कपड्यात गुंडाळून ठेवलेले आढळून आले. आईचा शोध घेतला मात्र कुठे ही आई आढळून न आल्याने, प्रवाशांनी ही बाब पोलीस प्रशासनास कळविली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, बाळाला ताब्यात घेतले अन् जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

महिला पोलीस कर्मचाऱ्याचे ममत्व झाले जागे

बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी शहर पोलीस ठाण्याच्या सुरेखा आत्राम, शारदा ढेंबरे आणि शेख सलमा यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र नेहमी आईच्या खुशीत राहणाऱ्या बाळाला आईचा स्पर्श न जाणवल्याने अन् दूध न मिळाल्याने बाळ जोरात रडत होते. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या शेख सलमा यांचे ममत्व जागे झाले अन् त्यांनी लागलीच बाळाला कुशीत घेऊन स्तनपान केले, तेव्हा कुठे बाळ शांत झाले. त्यामुळे शेख सलमा यांचे कोतुक केले.

निर्दयी मातेचा घेतला जात आहे शोध

हिंगोली पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या बाळाच्या आईचा कसून शोध घेतला जात आहे. सोशल माध्यमांवर व्हायरल केले आहेत. शिवाय, पथकामार्फतही मातेचा शोध घेतला जात आहे. अजून तरी मातेचा शोध लागलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.