ETV Bharat / state

चिंताजनक...हिंगोलीत 10 कोरोना रुग्ण आढळले; रुग्णसंख्या 585 वर

हिंगोलीत मंगळवारी 10 कोरोनाबाधित वाढले. त्यामुळे रुग्णसंख्या 585 वर पोहोचली आहे. 385 जण कोरोनामुक्त झाले असून 194 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Hingoli Corona update
हिंगोली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 29, 2020, 8:42 AM IST

हिंगोली- जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नव्याने 10 कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 585 वर पोहोचली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्या उपचारामुळे एकूण 13 रुग्ण हे बरे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये हिंगोली शहरातील महादेव वाडी भागात 1, पेन्शनपुरा 1, तोफखाना 2 आदर्श कॉलेज भागातील यशवंत नगर 1, गाडीपुरा 1 अष्टविनायक नगर 1, हिंगोली तालुक्यातील सवड येथे 1 आणि वसमत शहरातील मंगळवार पेठ भागात 1 येथील व्यक्तींचा समावेश आहे.

सध्या हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 585 झाली आहे. 385 रुग्ण बरे झाले आहेत. तर 194 रुग्णावर विविध कोरोना वार्ड तसेच कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या पैकी 14 रुग्णांची प्रकृती ही गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. एका 28 वर्षीय रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याला बायपॅप मशीनवर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे 15 रुग्णांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे ज्या भागांमध्ये अगोदर रूग्ण आढळले आहेत, त्या भागातील परिसरात वास्तव्यास असलेले नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत.

दरम्यान, राज्यात मंगळवारी 7 हजार 717 कोरोनाबाधितांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3 लाख 91 हजार 440 वर पोहोचली आहे. दिवसभरात 10 हजार 333 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. एकूण 232277 रुग्ण बरे झाल्याने दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 144694 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात मंगळवारी 10333 एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.34 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 232277 झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.