ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्याला वाढत्या तापमानाचा तडाखा; ४६ अंशसेल्सिअसची नोंद - Temperture

हिंगोली जिल्ह्याचे मागील तीन दिवसांपासून तापमान एवढे वाढले आहे, की कडक उन्हाने शरीर अक्षरशः भाजून निघत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान कमाल ४६ अशंसेल्सिअस आणि किमान ३० अंशसेल्सिअस असे होते. पहिल्यांदाच या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर जाऊन पोहोचला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वाढते तापमान
author img

By

Published : Apr 28, 2019, 10:28 PM IST

हिंगोली - जिल्ह्याचे मागील तीन दिवसांपासून तापमान एवढे वाढले आहे, की कडक उन्हाने शरीर अक्षरशः भाजून निघत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान कमाल ४६ अशंसेल्सिअस आणि किमान ३० अंशसेल्सिअस, असे होते. तापमान वाढतच असल्याने सावलीतही उन्हाच्या झळा जाणवत आहेत.
पहिल्यांदाच या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे रविवारी रेकॉर्ड ब्रेक तापमान असल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.

सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आलेली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांचे तापमान ४० ते ४२ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. हिंगोली जिल्ह्याचे तापमान चक्क ४६ अंशावर पोहोचल्याने मोठ्य़ा प्रमाणावर उन्हाचे चटके जाणवत आहेत. या वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. टिनपत्र्यांच्या घरात तर मोठ्या प्रमाणात वाफा जाणवत आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईचे ग्रहण असल्याने काही भागात उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थ पाण्याच्या शोधात भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई सर्वाधिक जास्त जाणवत असल्याने, टँकर्सची संख्या ४० पेक्षा अधिक झाली आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्याचे तीन दिवसांपासून तापमान एवढे वाढले आहे की, कडक उन्हाने शरीर पूर्णतः भाजून निघत आहे. आज तर जिल्ह्याचे कमाल ४६ अन किमान ३० अंश तापमानाचा पारा असल्याने सावलीतही उन्हाच्या वाफा जाणत आहेत. पहिल्यांदाच या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आज रेकॉर्ड ब्रेक तापमान असल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.

Body:सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आलेली आहे त्यामुळे दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्याचे तापमान 40 ते 42 अंशावर जाऊन पोहोचले आहे. आज घडीला हिंगोली जिल्ह्याचे तापमान चक्क ४६ अंशावर पोहोचल्याने उन्हाचे चटके जाणवत आहेत. या वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. टिन पत्राच्या घरात तर असह्य वाफा जाणवत आहेत. अशाच परिस्थिती हिंगोली जिल्ह्याला पाणीटंचाईचे ग्रहण असल्याने, काही ग्रामीण भागात उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थ पाण्याच्या शोधात भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाई सर्वाधिक जास्त जाणवत असल्याने, टँकर ची संख्या ४० वर जाऊन पोहोचली आहे.

Conclusion:आज हिंगोली जिल्ह्याचे रेकॉर्ड ब्रेक तापमान असल्याने, ऊन्हात जाण्याचे टाळण्याचे सल्ले डॉक्टर देत आहेत. असे ही नागपूर, अकोला पाठोपाठ हिंगोली जिल्ह्याचा ही तापमानाचा पारा वाढत चालला आहे. वाढते तापमान लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. तापमानापासून बचाव करणारी औषधी प्रत्येक रुग्णालयात उपलबद्ध करून दिली सोबतच मुख्य बाब म्हणजे उष्मघात कक्षाची देखील स्थापना केली.

उन्हापासून बचाव करण्यासाठी हे करा

१ तहान लागलेली नसली तरी जास्तीतजास्त पाणी प्यावे,

२ हलकी पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत

३ बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चप्पल चा सर्वाधिक जास्त वापर करावा

४ शक्यतोवर प्रवास टाळावाच शक्य नसेल तर पाण्याची बाटली सोबत न्यावी

५ उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्याने डोळे मान चेहरा झाकावा

६ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ आर एस, घरी बनवण्यात आलेली तोरणी, लिंबू, पाणी ताक, दही आधीचा नेहमी वापर करावा

७ अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे आहेत. ही लक्षणे ओळखून तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

८ गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्याना पुरेसे पाणी ही पिण्यासाठी ध्यावे.

९ घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शेटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तर रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.

१० पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.

११ सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.

१२ पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.

१३ गरोदर महिला कामगार व आजारी यांची अधिक काळजी घ्यावी.,

१४ रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेड उभारावे

१५ जागोजागी पाणपोईची सुविधा करावी

उन्हापासून बचाव करण्यासाठी जेवढे उपाय अवलंबीता येतील तेव्हडे अवलंबून उन्हापासून बचाव करावा.,

जास्त तापमान असलेला फोटो मेल केला आहे बातमीत वापरावे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.