ETV Bharat / state

हिंगोलीत शिक्षकाची आत्महत्या, तू घरी जा मी शेत सांभाळतो असे भावाला सांगून घेतला गळफास - हिंगोली शहर बातमी

नेहमीप्रमाणे लहान भावाला मी आता शेत सांभाळतो तू घरी जा, असे म्हणत शेतात रात्र गस्तीला गेलेल्या शिक्षकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.

मृत शिक्षक
मृत शिक्षक
author img

By

Published : Nov 3, 2020, 4:08 PM IST

हिंगोली - स्वतःच्याच शेतात एका शिक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज (दि. 3 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्र्यंबक वाबळे असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

ते गेल्या दहा ते बारा वर्षांपासून हिंगोली तालुक्यातील इंचा फाटा येथे असलेल्या गुरुदास कामत विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे दोन विवाह झाले असून, पहिल्या पत्नीबरोबर न्यायालयीन भांडण सुरू आहे, तर दुसऱ्याही पत्नीचे भांडण सुरू आहे. शिवाय दहा वर्षांपासून शिक्षक असलेल्या शाळेतून त्यांना पगार देखील पुरेसा मिळत नव्हता. या ठिकाणी भरण्यात आलेले पैसे तसेच रात्रंदिवस शेतामध्ये काम करून ते आपल्या संसाराचा गाडा ओढत होते.

खूप दिवसांपासून ते नैराश्येत होते

दोन्हीही पत्नीचे भांडण सुरू असल्याने आणि पुरेसा पगार नसल्याने, वाबळे यांना खूपच नैराश्य आले होते. मागील काही दिवसांपासून ते नैराश्येत होते. दिवसा शाळेत व रात्री शेताची राखण करण्यासाठी ते शेतात जात होते.

मित्रांनी खूप केला होता चहा पिण्याच्या आग्रह

वाबळे हे नेहमीच शेतात जात असताना, मित्र मंडळीला भेटून हसत खेळत जात असत. त्यामुळे मित्रांनी त्यांना चहा पिण्याचा खूप आग्रह केला होता. मात्र, यावेळी त्यांनी चहा पिण्यास स्पष्ट नकार दिल्याचे त्यांचे भाऊ गंगाधर वाबळे यांनी सांगितले.

विनाअनुदानीत शाळा असल्याने वेतन कमी

दहा ते बारा वर्षांपासून ज्या शाळेत ते काम करत होते. ती शाळा विनाअनुदानित होती. त्यामुळे त्यांना वेळेवर व समाधानकारक पगार मिळत नव्हता. त्यातच पहिली पत्नी सोडून गेली व दुसरी पत्नी भांडण करते म्हणून ते मानसिक तणावात होते.

घटनेचा पंचनामा करून, मृतदेह शेवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

हेही वाचा - उपासमारीची वेळ आल्याने मदत करा, देहविक्री करणाऱ्या महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.